राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा…

chhagan-bhujbal
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना आता ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सदन आणि तळोजा गृहप्रकल्प गैरव्यवहार प्रकरणात छगन भुजबळ यांना दोषमुक्त करण्यात आले आहे. ईडीने दाखल केलेल्या प्रकरणामध्ये आता छगन भुजबळ यांची सुटका झाली आहे. याआधीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भुजबळ यांना क्लिन चिट दिली होती.

ईडीने PMLA कोर्टात दाखल केलेल्या दाव्यात आता भुजबळ यांची मुक्तता करण्यात आली आहे. PMLA कोर्ट न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी भुजबळांसहीत इतर 40 आरोपींची याचिका मंजूर केली आहे. महाराष्ट्र सदन आणि तळोजा गृहप्रकल्प गैरव्यवहार गुन्हा आधारावर ED ने याचिका दाखल केली होती. मात्र,मूळ गुन्ह्यात दोषमुक्त झाल्याने ED दाखल खटल्यात मुक्त करावे, अशी मागणी भुजबळ यांच्या वतीने याचिकेत करण्यात आली होती. आम्हाला दोषमुक्त करा, अशी याचिका दाखल करण्यात आली होती.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

अखेरीस या प्रकरणी आज PMLA कोर्ट न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी याचिका मंजूर केली. या प्रकरणात छगन भुजबळ यांच्यासह ४० जणांची मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानंतर आता ईडीच्या केसमध्येही भुजबळांची मुक्तता करण्यात आली आहे. प्रेडिकेट ऑफेन्स नसेल तर ईडीची केसही उभी राहू शकत नाही, या आधारावर कोर्टाने मुक्ताची केली आहे.

ईडीने मनी लाँड्रिंगचा आरोप करत भुजबळांविरोधात गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणी याचिकाही दाखल केली होती. पण, याच प्रकरणामध्ये मुक्तता झाली आहे. याचा आधार भुजबळांच्या वकिलांनी कोर्टात याचिका दाखल केली. कोर्टाने प्रडिकेट ऑफेन्स नाही असं नमूद केलं, त्यामुळे ईडीचा खटला हा पुढे चालू शकणार नाही. त्यामुळे या प्रकरणातून भुजबळ यांची मुक्तता झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *