मुंबई : महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचं लक्ष आता महापौर आरक्षण सोडतीकडे लागले आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी 22 जानेवारीला आरक्षणाची सोडत निघणार आहे. त्यामुळे कोणत्या महानगरपालिकेत कोणत्या आरक्षणातुन कोणता महापौर बसणार याकडे सर्वांच लक्ष असणार आहे. या आरक्षण सोडतीची प्रक्रीया नेमकी काय, कशी असणार आहे, याची माहिती जाणून घेऊयात.
22 जानेवारी रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीतूनच विजयी नगरसेवकांपैकी कोण महापौर होणार हे समजणार आहे. कारण, ज्या प्रवर्गासाठी हे आरक्षण जाहीर होईल, त्याच प्रवर्गातील व्यक्तीला महापौरपदाची लॉटरी लागणार आहे. मुंबईत एसटी प्रवर्गासाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यास मोठी उलथापालथ मुंबईत पाहायला मिळेल. कारण, येथील एसटी प्रवर्गातील दोन्ही जागेवर ठाकरेंचेच उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडे एसटी प्रवर्गाचे विजयी उमेदवार नाहीत. त्यामुळे, आरक्षण सोडत अत्यंत महत्वाची बनली आहे. मात्र, ही आरक्षण सोडत नेमकं कशी होणार हेच जाणून घेता येईल.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
‘महापौर’पदाची आरक्षण सोडत कशी असणार पाहा…
– महापौर पदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने निघणार आहे.
– साधारणत: मागील 20 वर्षांचं आरक्षण लक्षात घेतलं जाणार आहे.
– जे आरक्षण याआधी त्या महापालिकेत होतं, ते वगळता इतर आरक्षणाची चिठ्ठी असणार आहे.
– एससी, एसटी, ओबीसी आणि खुला वर्ग, त्यामध्ये पन्नास टक्के महिला आरक्षण असे आरक्षणाचे प्रवर्ग असणार आहेत.
– त्या महापालिकेमध्ये याआधी कोणतं आरक्षण झालेलं आहे, ती चिठ्ठी बाजूला करुन उर्वरित आरक्षणाच्या चिठ्ठ्या टाकल्या जाणार आहेत.
– या चिठ्ठ्या बॉक्समध्ये टाकताना सर्वांना दाखवल्या जातील, त्यानंतर पारदर्शक असणाऱ्या बॉक्समध्ये त्या टाकल्या जातील.
– त्या सर्व चिठ्ठ्या एकत्र झाल्यानंतर त्यातून एक-एक चिठ्ठी बाहेर काढून आरक्षण सोडत जाहीर केली जाणार आहे.
– त्यानंतर पुन्हा 50 टक्के महिला आरक्षणाच्या चिठ्ठ्या टाकून महिला आरक्षण काढलं जाणार आहे.
दरम्यान, या पद्धतीने राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाचे आरक्षण 22 जानेवारीला सकाळी 11 वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहामध्ये होणार आहे.
मुंबई महापौरची शर्यत! प्रभाकर शिंदे की विनोद मिश्रा; देवेंद्र फडणवीस कोणाची ‘गुगली’ टाकणार
भाजपकडून महापौर पदाची ऑफर! मुंबईकडे लक्ष पण सत्तेची चावी चंद्रपुरात
मुंबई महापौर युद्ध सुरू! शिंदेसेनेने अडीच वर्षांसाठी डाव टाकला, भाजपाच्या सत्ता योजना संकटात