अमरावती : भाजप नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या डायल 112 क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने फोन करुन नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नवनीत राणा यांना यापूर्वीही फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
राज्यात नुकतेच महापालिका निवडणुका पार पडल्या असून अमरावतीत भाजप आणि आमदार रवि राणा यांच्या पक्षाला यश मिळाले आहे. महापालिका विजयानंतर राणा दाम्पत्याने विजयाचा आनंद साजरा केला. मात्र, या निवडणुती एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी नवनीत राणा यांच्यावर केलेली टीका चर्चेत आली. कारण, नवनीत राणा यांनी काही दिवसापूर्वी मुलांना जन्म घालण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. ओवैसी यांनी आपल्या भाषणात तोच मुद्दा उपस्थित करत नवनीत राणा यांना डिवचले होते. त्यानंतर, अज्ञात व्यक्तीने पोलिसांना फोन करुन नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
बाबा सिद्दिकी सारखीच नवनीत राणा यांची हत्या करू असा फोन पोलिसांना 112 नंबरवर आला होता. या संदर्भात नवनीत राणा यांचे खासगी स्वीय सहाय्यक सचिन सोनोने यांनी राजापेठ पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध राजापेठ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी, पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, यापूर्वी हैदराबाद येथील अब्दुल नावाच्या एका व्यक्तीकडून घाणेरड्या शब्दात नवनीत राणांना पत्र स्वरुपात धमकी आली होती. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आठवडाभरात त्यांना धमकीचे दुसऱ्यांदा पत्र आले होते. तेव्हाही, राणा यांच्या पीएच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.