बीड : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मुंबई आणि पुण्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. ज्या पुण्यात अजित पवारांनी मोफत मेट्रो आणि बससेवा देण्याची घोषणा केली होती, त्या पुण्यात अजित पवारांना केवळ 27 जागा जिंकता आल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेतही अजित पवार यांना मोठं अपयश पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्या पराभावाचे मनोज जरांगे यांनी कारण सांगितले आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात भाजपला मिळालेल्या यशावर बोलताना त्यांनी अजित पवारांना लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, ‘भाजपवाले कलाकार आहेत, त्यांनी सगळ्यांचा काटा काढला. अजित पवार यांनी नासके लोक आपल्यासोबत ठेवल्यामुळे त्यांना मराठ्यांचे मतदान पडलं नाही. सन 2029 च्या निवडणुकीत मराठा, मुस्लिम आणि दलित एक झाले तर भाजपाला चिरडतील. भाजपने पहिली महाविकास आघाडी संपवली, आता शिंदेचा आणि अजित दादाचा बरोबर काटा काढला.’

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
अजित दादा पण असे लोक सांभाळतो, त्यामुळे लोक लांब चालले आहेत, त्यांना आता कळालं. पापी लोक, रक्ताने माखलेले लोक सोबत ठेवले तर असे परिणाम भोगावे लागतील. अजित दादांनी याच्यातून तरी समज घेतली पाहिजे. आपण असे नासके लोक सोबत ठेवले म्हणून आपल्यावर इतकी वाईट वेळ आली की मराठ्यांचं मतदान सुद्धा पडलं नाही. नाहीतर पुण्यात अजित दादाला इतके कमी यश भेटलं नसतं. भाजप त्या लोकांना का जवळ करत नाही, यातून अजित पवारांनी काहीतरी शिकावं. दोन नासके सांभाळल्यामुळे मराठा समाज दूर गेला. त्यामुळे महानगरपालिकेला केवळ मराठ्यामुळेच पडावं लागलं, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. तसेच, नाव न घेता धनंजय मुंडे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.
चर्चांना उधाण! अजित पवार घेणार मोठा निर्णय? राजकीय हालचालींना वेग…