पुणे: निवडणुकीच्या तोंडावर दोन राष्ट्रवादी एकत्र आणून निवडणुकीसाठी सामोरे गेलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोठा झटका बसला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मतमोजणीत भाजपने आघाडी घेत बहुमताचा आकडा गाठला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 128 जागांसाठी झालेल्या या लढतीत भाजपने 74 जागांवर आघाडी घेत सत्ता कायम राखण्याच्या दिशेने कूच केली आहे. दुसरीकडे, अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्रित राष्ट्रवादी आघाडीला केवळ ४१ जागांवर समाधान मानावे लागत असल्याचे सध्यातरी दिसत आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
पुणे महानगरपालिकेच्या 165 जागांसाठी आज (गुरुवार) होत असलेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने (BJP+) मोठी मुसंडी मारली आहे. आतापर्यंतच्या कलांनुसार, भाजपने 90 जागांवर आघाडी मिळवत महापालिकेत आपली एकहाती सत्ता पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. पुणे महापालिकेत बहुमतासाठी 82 जागांची आवश्यकता आहे.
दुसरीकडे, दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र येण्याला विरोध करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून काँग्रेस पक्षात गेलेले प्रशांत जगताप विजयी झाले आहेत. जगताप यांच्या विजयाने पुण्यात काँग्रेसनं खातं खोलले आहे. भाजपाच्या विरोधात प्रशांत जगताप निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेल्या शिवरकरांचा प्रशांत जगताप यांनी पराभव केला आहे.