चर्चांना उधाण! अजित पवार यांना गुन्हेगार उमेदवारांबद्दल विचारले अन् विषयच संपवला…

ajit-pawar
Share

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शनिवार) पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पक्षाचे हमीपत्र जाहीर केले. या हमीपत्रात पुणे शहराच्या विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर पक्षाची भूमिका आणि आगामी काळातील योजना सविस्तरपणे मांडण्यात आल्या आहेत. मात्र, याच वेळी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं देत विषय टाळल्याने चर्चांना उधाण आले आहे.

पुण्याचा वाहतूक कोंडीचा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे, तितकाच गंभीर प्रश्न शहरातील वाढती गुन्हेगारीही आहे. कोयता गँग, टोळी युद्ध, दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या आणि दहशतीमुळे पुणे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात चर्चेत आले आहे. अशा पार्श्वभूमीवर, पुण्याच्या पालकमंत्र्यांकडून गुन्हेगारीवर ठोस भूमिका अपेक्षित असताना अजित पवार यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीशी संबंधित कुटुंबातील दोन सदस्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या दोघींनाही आयुष कोमकर हत्या प्रकरणात अटक झाली असून त्या सध्या तुरुंगात आहेत. अशा पार्श्वभूमीवर, तुरुंगात असलेले उमेदवार निवडणूक लढवत असताना त्यावर पक्षाची भूमिका काय? असा थेट प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. पण, अजित पवार यांनी हा मुद्दा गांभीर्याने न घेता उडवाउडवीची उत्तरं देऊन विषय थांबवला. यामुळे “पुण्यातील गुन्हेगारी हा गंभीर प्रश्न नाही का?” असा सवाल उपस्थित झाला आहे.

पुण्यात सध्या रस्त्यावरच हत्या होत आहेत, एका महिन्यात टोळी संघर्षातून तीन-तीन खून होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. कोयता गँगसारख्या टोळ्यांमुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. अशा परिस्थितीत शहराचा कारभार पाहणारे आणि उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार गुन्हेगारीबाबत इतकं हलकं उत्तर कसं देऊ शकतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवार यांच्या उत्तरामुळे अनेक शंका उपस्थित झाल्या असून, चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवार यांचा एकेरी उल्लेख, आम्ही काय बांगड्या घातल्यात का…

चर्चांना उधाण! कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नीला अजित पवार गटाकडून उमेदवारी…

अजित पवार यांची 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर; पाहा नावे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *