भाजप आमदाराचं मोठं वक्तव्य! भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास…

Share

सोलापूर: भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जातील त्यांचा प्रचार आम्ही करणार असल्याची भूमिका सोलापुरातील भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी घेतली आहे.

भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे मोठे विधान केल्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. जर भाजपमधून आमच्या निष्ठावान कार्यकर्त्याला तिकीट मिळाले नाही तर ते महायुतीतील इतर पक्षात जातील आणि आम्ही त्याचा प्रचार करु. पंधरा दिवसांपूर्वी पक्षात आलेले लोक आमच्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. या निवडणुकीत उमेदवार किती खर्च करणार किंवा त्याची किती क्षमता आहे, याबाबत मुलाखतीतून विचारणा होते, याचं आश्चर्य वाटते. भाजपमध्ये अशा पद्धतीने किती खर्च करणार हे विचारण्याची पद्धत नव्हती आणि नाही, असेही देशमुख म्हणाले.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास ते कुठल्याही पक्षातून उभे राहू दे आम्ही कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याची भूमिका आमदार देशमुख यांनी घेतली आहे. निवडणूक समितीत कोण-कोण आहेत मला माहिती नाही. त्यामुळे जागांच्या वाटघाटी हे केवळ पालकमंत्री जयकुमार गोरे करत आहेत. कोणाशी चर्चा करायच्या हे माहिती नसल्याने मी कुठेही चर्चेला गेलो नाही, असेही विजयकुमार देशमुख यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *