ठाकरे बंधू 18 वर्षानंतर एकत्र! शिवसेना-मनसे युती झालीय हे आम्ही जाहीर करतोय…

thackeray-brother
Share

मुंबईः ठाकरे बंधू तब्बल 18 वर्षानंतर एकत्र आले आहेत. आम्ही एकत्र आलोय, ते एकत्र राहण्यासाठी असे म्हणत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील नवा अध्याय लिहायला सुरूवात केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत.

ऐतिहासिक युती जाहीर करताच ठाकरेंचे दोन मास्टरस्ट्रोक पहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीच्या वेळेला भाजपने बटेंगे तो कटेंगे असा प्रचार केला होता. पण मराठी माणसाला सांगतोय की, आता जर चुकाल तर संपाल… आता फुटाल तर संपून जाल. मराठीचा वसा टाकू नका, असे उद्धव ठाकरे म्हणाले अन् ठाकरेंच्या युतीचा पहिला मास्टरस्ट्रोक टाकला. तर मुंबईत मराठीच महापौर होणार, असे म्हणत राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे मी एका मुलाखतीमध्ये म्हणालो होतो आणि त्या मुलाखतीपासूनच आम्ही एकत्र येण्याला सुरुवात झाली. आज मुंबईसाठी शिवसेना आणि मनसे युती झाल्याचे जाहीर करत आहोत, अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशी राज आणि उद्धव यांची संयुक्त पत्रकार परिषद आज हॉटेलमध्ये पार पडली. यावेळी अत्यंत स्मित हास्य करत राज ठाकरे यांनी युती केल्याच जाहीर केली. मात्र, मुंबईमध्ये कोण किती जागा लढवणार हे आम्ही आता सांगणार नाही, असे सांगत भाजपला प्रत्यक्ष टोला लगावला.

महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरत आहेत. त्यामध्ये दोन टोळ्या अजून जास्त अॅड झाल्या आहेत ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. मुंबईमध्ये मराठी आणि आमचाच महापौर होणार असा विश्वास राज यांनी व्यक्त केला. बाकी जे बोलायचं ते आम्ही जाहीर सभांमधूनच बोलू, माझ्याकडे सुद्धा खूप व्हिडिओ असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला सुद्धा इशारा दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मुंबईचे लचके तोडायचे आहेत, मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळी ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी दोघेजण दिल्लीत बसलेले आहेत त्यांचे हे मनसुबे आहेत. आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत आणि मी मागेच म्हटलं एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रवर कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबईला महाराष्ट्रपासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत. आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल, म्हणून परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका हाच एक संदेश मी आमच्या आज दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे, अशी भावनिद साद त्यांनी घातली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *