पुणे: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची तयारी मोठ्या प्रमाणावर सुरू असून, इच्छुकांच्या मुलाखती, चर्चा, युती, जागावाटप यासंबंधीच्या चर्चा सुरू आहेत. पुण्यात महायुतीतील शिवसेना आणि भाजपची एक बैठक पार पडली आहे. यानंतर आता शिवसेना शिंदे गटाला पुण्यात 35 ते 40 जागा हव्या असून, बैठकीला उपनेते रवींद्र धंगेकर शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थितीत होते अशी माहिती समोर आली आहे.
शिवसेनेचे नेते रविंद्र धंगेकर बैठकीआधी १६५ जागांवर उमेदवार देण्यासाठी ठाम होते, तर शहरप्रमुख नाना भानगिरे महायुतीसोबत युती करण्यावर ठाम होते आणि त्यांनी भाजपकडे ३५-४० जागा मागणार असल्याचे सांगितले होते. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रात्री पुण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. येत्या तीन-चार दिवसात जागा वाटपाबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
काल दुपारी भाजप आणि शिवसेनेची बैठक पार पडल्यानंतर रात्री उशिरा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यासोबत महानगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा केली. काल दुपारच्या बैठकीला रवींद्र धंगेकर उपस्थित होते. मात्र उदय सामंत यांची रात्री उशिरा धंगेकरांनी भेट घेतली. पुणे महापालिकेत भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहेत. बैठकीला उपनेते रवींद्र धंगेकर शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थितीत होते अशी माहिती समोर आली आहे.
भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून पुणे महापालिकेत किमान १२५ जागा जिंकण्याचा दावा करण्यात येत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौऱ्यात भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर जागावाटपाबाबत हालचालींना वेग आला आहे. भाजपकडे सध्या १०५ माजी नगरसेवकांचे संख्याबळ आहे. गेल्या वेळी दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या उमेदवारांना भाजप संधी देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजप १२५ जागा निवडून आणण्यासाठी चांगले प्रयत्न करणार आहे. १२५ व्यतिरिक्त जागांवरच महायुतीच्या वाटाघाटी होणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. भाजपने मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने जिंकलेल्या सुमारे ५० जागांवर लक्ष केंद्रित केले असून त्या ठिकाणी तगडे उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू आहे.