मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील २९ महापालिकांच्या २८६९ जागांसाठी निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज (सोमवार) केली. राज्यातील सर्व महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होईल. निवडणूक जाहीर झाल्याने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून महापालिका निवडणुकीची तयारी करीत असलेल्या उमेदवारांनी अखेर सुटकेचा निश्वास टाकला आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी ३ कोटी ४८ लाख मतदार आहेत. संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर दुहेरी तारांकित (डबल स्टार) असणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि राज्य निवडणूक आयुक्त सचिव सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषद घेतली.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय प्रचारासाठी बनवा स्वतःचे पुस्तक…
मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला तेव्हापासून शहराचा कारभार प्रशासकाच्या हाती गेला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांमुळे निवडणूक पुढे ढकलत गेली. आता जवळपास साडेतीन वर्षांनंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. त्याचबरोबर पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, अमरावती या आणि अशा अनेक महापालिकांच्या निवडणुका देखील रखडल्या होत्या.
कोणत्या महापालिका निवडणुकांसाठी मतदान…
मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, वसई-विरार, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, धुळे, इचलकरंजी, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मालेगाव, नांदेड-वाघाळा, परभणी, सांगली-मिरज-कुपवाड, सोलापूर.
महापालिका निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम
अर्ज दाखल करण्याची तारीख- २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५
अर्जाची छाननी- ३१ डिसेंबर २०२५
अर्ज मागे घेण्याची तारीख- २ जानेवारी २०२६
निवडणूक चिन्ह वाटप- ३ जानेवारी २०२६
मतदान कधी?- १५ जानेवारी २०२६
निकाल कधी?- १६ महापालिका