नागपूर: महाराष्ट्र विधानभवनाच्या लॉबीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांची मारहाणी प्रकरणात कारागृहाच्या शिक्षेची शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात अहवाल सादर करण्यात आला असून ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुख यांच्यावर कारागृह शिक्षेची शिफारस करण्यात आली आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
पावसाळी अधिवेशनाच्या काळात विधान भवनाच्या परिसरात घडलेल्या धक्कादायक हाणामारीने संतापालाची लाट पसरली होती. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये ही हाणामारी झाली होती. गोपीचंद पडळकर यांनी सातत्याने शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनाच्या परिसरातच ‘मंगळसूत्र चोर’ अशी घोषणा दिली होती. नंतर शाब्दिक चकमकीचे रुपांतर थेट धक्काबुक्कीत आणि नंतर हाणामारीत झाले होते. या संपूर्ण प्रकरणाची नोंद मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून करण्यात आली.
विधान भवनाच्या विशेष हक्कभंग समितीकडून या घटनेची स्वतंत्र चौकशी सुरू झाली. समितीचा तपशीलवार अहवाल आता पूर्ण झाला असून तो सभागृहात सादर केला जाणार असल्याचे समजते. तसेच या अहवालानंतर राज्य शासन कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहे.