मुंबईः भाजप देवाभाऊमय आहेच, पण राज्यातील इतर पक्षही देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यानेच चालतात, असे वक्तव्य भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे, लोढा यांच्या या विधानामुळे आता राज्यात चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.
देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यावेळी मुख्यमंत्री झाले आहेत, तिसऱ्यावेळी मुख्यमंत्री झाल्यानंतर आज महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रामधील सर्वात कमी वयाचा महापौर, तीन वेळा मुख्यमंत्री तेही भाजप मजबूत स्थितीत नसताना देवेंद्र फडणवीस झाले आहेत. भाजप तर देवाभाऊचीच मात्र त्याच बरोबर महाराष्ट्रामधील कोणता पक्ष कसा चालणार हे देखील तेच ठरवतात. ते राज्यातील आमचे गुरू आहेत, त्यांची विविध रूपे आम्ही बघत आहोत, असे लोढा यांनी म्हटले आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
भाजप कार्यकर्त्यांना तिकीट द्या किंवा नका देऊ, मात्र ते काम करण्यासाठी आनंदित असतात. त्यामुळेच भाजप दोन वरून 275 पर्यंत पोहोचलेली आहे. आपलं घर यावेळी मुंबई आहे. मुंबईत निवडणूक जिंकायची असेल तर ती एकटी अमित साटम राहुल नार्वेकर यांची जबाबदारी होऊ शकत नाही, आपल्या सर्वांना ही जबाबदारी उचलायची आहे, असं यावेळी लोढा यांनी म्हटलं आहे. शेजारचा मुलगा कितीही सुंदर असला तरी आपण त्याला कमरेवर उचलत नाही, कमरेवर आपलाच मुलगा उचलतो. त्यामुळे मुंबईत महापौर भाजपचा बनेल असे म्हणत त्यांनी आता थेट अप्रत्यक्षपणे महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटला इशारा दिल्याचे बोलले जात आहे.