खासदारानं कुत्र्याला आणलं थेट संसद परिसरात; खरे चावणारे तर संसदेत…

renuka-chaudhary
Share

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज (सोमवार) पहिल्याच दिवशी काँग्रेस खासदार रेणुका चौधरी पाळीव कुत्र्यासह त्यांच्या गाडीतून संसदेत पोहोचल्या. भाजपने याला संसदेच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन असल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.

प्रसारमाध्यमांनी रेणुका चौधरी यांना या घटनेबद्दल प्रश्न विचारला तेव्हा त्या म्हणाल्या, “यात वाद काय आहे? कुठे असा नियम आहे की कुत्रा आणू नये? मी संसदेकडे येत होते. रस्त्यात एक स्कूटर गाडीला धडकली आणि एक छोटं पिल्लू रस्त्यावर भटकत होतं. ते गाडीत चिरडले जाईल म्हणून मी ते उचललं, कारमध्ये ठेवलं आणि संसदेत आले. नंतर कार परत गेली तेव्हा ते पिल्लूही घरी पाठवलं. मग यात वाद कशाचा? खरे चावणारे तर संसदेत बसले आहेत, तेच सरकार चालवतात! आम्ही एका मुक्या प्राण्याची काळजी घेतली म्हणून एवढा गाजावाजा? सरकारकडे दुसरं काही काम नाही का? मी कुत्र्याला घरी पाठवून सांगितलं की त्याची काळजी घ्या… पण जे रोज संसदेत बसून आम्हाला ‘चावतात’, त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही.”

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

सरकारला अधिवेशनाची इतकी काळजी होती, तर नियोजित एक महिन्याचे अधिवेशन फक्त पंधरा दिवस का कमी करण्यात आले? त्यांनी विचारले, “आम्ही कोणते मुद्दे उपस्थित करणार आहोत याची तुम्हाला काळजी का वाटते? पुरेसे मुद्दे नव्हते का? मग अधिवेशन का कमी करण्यात आले?, असेही रेणुका चौधरी म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *