Video: राहुल गांधी यांनी फोटो दाखवलेल्या ब्राझीलियन मॉडेल आली समोर…

Brazilian-Model-Larissa
Share

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तिसऱ्यांदा व्हिडीओ सादरीकरण करत भाजप आणि निवडणूक आयोगावर मतदार यादीत घोटाळ्याचा आरोप केला. दरम्यान, ‘H’ फाईल्स सादर करताना राहुल गांधी यांनी धक्कादायक आरोप करताना एकाच व्यक्तीच्या फोटोचा वापर 22 वेगवेगळ्या नावांनी मतदान करण्यासाठी करण्यात आला होता आणि ती दुसरी कोणी नसून ब्राझीलियन मॉडेल असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

राहुल गांधींच्या या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली. आता स्वत: ब्राझीलियन लारिसा या मॉडेलने एक व्हिडीओ प्रसिद्ध करुन यावर प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, ‘नमस्कार इंडिया, मला भारतीय पत्रकारांसाठी एक व्हिडीओ बनवण्यास सांगण्यात आले होते. म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे. माझा भारतीय राजकारणाशी काहीही संबंध नाही. मी कधीही भारतात गेले नाही. मी एक ब्राझिलियन मॉडेल आहे. मला भारतीय लोक आवडतात. खूप खूप धन्यवाद. नमस्ते…, असं लारिसा म्हणाली. हे संपूर्ण प्रकरण खूप गंभीर झाले आहे. काही भारतीय पत्रकार माझ्याकडून माहिती मागत आहेत. पहा, मी येथे आहे. काही भारतीय पत्रकार मला शोधत आहेत आणि माझी मुलाखत घेऊ इच्छितात. मित्रांनो, मी सर्वांना मुलाखती दिल्या आहेत, प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दिली आहेत. माझा फक्त फोटो वापरण्यात आला.’

हरियाणात एका महिलेचे फोटो मतदारयादीत वेगवेगळ्या नावांनी व तपशिलांसह अनेकवेळा वापरण्यात आले. ब्राझीलमधील महिला मॉडेल असलेल्या मॅथ्यूस फेरेरो यांचा हा फोटो असून, त्यांना स्वीटी, सीमा, सरस्वती अशी नावे मतदारयाद्यांत देण्यात आली आहेत, असे राहुल गांधींनी सांगितले. त्यांना दिलेली 22 वेगवेगळी नावे व त्याबरोबर या मॉडेलचा फोटो अशा नोंदी मतदारयाद्यांत आढळल्या आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी केला होता.

राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर नवा बॉम्ब! ब्राझील मॉडेलने हरियाणात केले 10 वेळा मतदान…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *