मुंबई : ऍड. गुणरत्न सदाव यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली आहे. राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनांव रोक के दिखाव, असे म्हणत राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरून देखील सदावर्ते यांनी पलटवार केला आहे.
राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात तापलं असून विरोधकांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. निवडणूक आयोगासह भाजपा सरकारलाही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सवाल केले आहेत. तसेच, मुंबईत 1 नोव्हेंबर रोजी याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि सर्वपक्षीय विरोधकांनी एकत्र येत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे हेही या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यावरून, आता ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, ‘तुम्हाला सांगतो देशात कायद्याच राज्य आहे, राज,उद्धव, शरद पवार म्हणतात म्हणून गलत काम मुंबईत चालणार नाही. त्यांनी सत्याचा मोर्चा नाही, तर ढोंग्याचा मोर्चा काढण्याचे काम सुरू केले आहे. हा लबाडांचा मोर्चा आहे, इतरांना जसे कायदे लागू असेल, त्यांना जो नियम तोच नियम राज, उद्धव आणि शरद पवारांच्या मोर्चाला असेल. उच्च न्यायालयाने विरोधकांना मोर्चासाठी आझाद मैदान ठरवून दिले आहे, उच्च न्यायालयाच्या निर्देशनुसार दुसरीकडे मोर्चा काढता येणार नाही. शरद पवार कृषीमंत्री होते, मुख्यमंत्री होते त्यांना या वयात हे उलगडू नये?. उद्धव ठाकरेंचा संजूबाबा म्हणाला की बोलून वळवता येत नसते, सुप्रीम कोर्टाची केस तिकडे वळू असे म्हणतो. पण, तुमच्यात निवडणूक लढायची ताकद नाही म्हणून तुम्ही हे करता. शरद पवार, संजूबाबा बोलायचे निवडणुका पाहिजे, आता निवडणुका लागत आहेत.’
राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनांव रोक के दिखाव. नियमात मोर्चा असेल तर परवानगी द्यावी, अन्यथा नाही. हे दळभद्री उद्या मरणार म्हणून आज गौऱ्या रचत आहेत. जरांगेच्या वेळी न्यायालयाने सांगितले होते की मोर्चा ठरवून दिलेल्या जागीच केले पाहिजे. ते जर जास्त डुर डुर करू लागले तर त्यांच्या मुसक्या आवळा. सुमार दर्जाचा व्यंगचित्रकार उद्धव हा नालायक आहे. त्यामुळे, या मोर्चाला पाठ फिरवा. जोपर्यंत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त होत नाही, हा घोळ मिटत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावरुन, सदावर्ते यांनी खोचक टीका केली आहे.