मुंबई: कॉकरोच जनता पक्षाचे (सीजेपी) नेते अभिजीत दीपके यांनी सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. सरकार आणखी किती लोकांना अटक करणार आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. सीजेपीने १० ऑक्टोबर रोजी संपूर्ण देश रस्त्यावर उतरेल, अशी घोषणा केली आहे.
दरम्यान, सौरभ दास यांनी दावा केला की, आशुतोष रांका, अभिजीत दीपके आणि आपल्या स्वतःला अटक केली जाऊ शकते. अभिजीत दीपके म्हणाले की, लोकांना अटक करता यावी, यासाठी त्यांच्या भागातील डीसीपींना हटवून नवीन डीसीपींची नियुक्ती करण्यात आली आहे.
सौरभ दास यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले की, सरकार त्यांना, अभिजीत, आशुतोष, रत्ना आणि कॉकरोच जनता पक्षाच्या इतर नेत्यांना अटक करण्याची योजना आखत आहे. अशा हुकूमशाही कारवाया यशस्वी होतील असे सरकारला वाटत असेल, तर त्यांचा गैरसमज आहे. तरुण पिढी आता जागी झाली आहे.
सौरव पुढे म्हणाला, की आपण त्यांच्यासोबत असो वा नसो, आपल्या हक्कांसाठी आणि भविष्यासाठीचा लढा सर्वांनी सुरू ठेवावा, असे आम्ही आवाहन करतो. तुरुंगवास किंवा त्याहूनही वाईट परिस्थितीला सामोरे जाण्याची आमची नेहमीच तयारी राहिली आहे. पण ती एक गंभीर चूक ठरेल. तरुण हे सहन करणार नाहीत. आंदोलन सुरूच राहिले पाहिजे. भारतातील जनतेने हे सुनिश्चित केले पाहिजे की १० ऑक्टोबर रोजी सर्वात मोठे जनआंदोलन सुरू होईल.
अभिजीत दीपके यांनी ‘एक्स’वरील सौरवच्या पोस्टवर टिप्पणी केली, की अमित शाह, तुम्ही किती जणांना अटक करणार? संपूर्ण देश १० ऑक्टोबरला रस्त्यावर येणार आहे.
पोलिसांच्या सूत्रांनुसार, दिल्लीतील आंदोलनादरम्यान अनेक आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी दीपके यांने ही प्रतिक्रिया दिली. पोलिसांनी सांगितले की, रविवारच्या आंदोलनासंदर्भात सुमारे १२० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आंदोलन सुरूच राहिले पाहिजे. भारतातील जनतेने १० ऑक्टोबरपासून जास्तीत जास्त जनसमर्थन मिळवले जाईल याची खात्री केली पाहिजे.
यापूर्वी, अभिजीत दीपके म्हणाले की, या सरकारसाठी ज्ञानेश कुमार हे देशातील नागरिकांपेक्षा जास्त मौल्यवान आहेत. कारण सत्तेत राहण्यासाठी त्यांना तुमची किंवा तुमच्या मतांची गरज नाही. त्यांना फक्त ‘ज्ञानू’ची गरज आहे. आणि म्हणूनच ‘ज्ञानू’ला जावेच लागेल. अभिजीत दीपके पुढे म्हणाला की, जर सरकारला वाटत असेल की यूएपीए, एनएसए किंवा तुरुंगवासाची धमकी आम्हाला शांत करू शकेल, तर तसे होणार नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास आणि गरज पडल्यास महिने किंवा वर्षे तुरुंगात घालवण्यासही तयार आहोत, पण लोकशाही वाचवण्याच्या आमच्या लढ्यातून आम्ही मागे हटणार नाही. आम्ही महात्मा गांधींनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करतो आणि सरकार आम्हाला कितीही घाबरवण्याचा प्रयत्न करो, आम्ही शांततेने आणि अहिंसक मार्गाने आंदोलन करत राहू.