शरद पवार यांचं नेहमी कौतुक करणाऱ्या संजय राऊत यांचाही अखेर सुटला संयम…

sanjay-raut
Share

मुंबई : देशाच्या लोकशाहीसाठी घातक असणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार) घेतला असेल तर यापुढे त्यांना फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेण्याचा अजिबात अधिकार नाही. मोदी-शाहांचे हात बळकट करणे हा महाराष्ट्रद्रोह आहे. लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या विधेयकाला जर शरद पवार पाठिंबा देणार असतील तर आम्ही शांत बसणार नाही, अशा संतप्त भावना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केल्या. नेहमी शरद पवार यांचे कौतुक करणाऱ्या संजय राऊत यांचा यावेळी संयम सुटलेला दिसत आहे.

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिल्यानंतर आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या भूमिकेमुळे शिवसेना आणि काँग्रेस संतप्त झाली आहे. राष्ट्रवादीकडे केवळ १० आमदार होते, असे असताना आम्ही आमच्या मतांच्या जोरावर शरद पवार यांना खासदार करून राज्यसभेत पाठवले, तेच पवार आज मोदी-शाहांना मदत करायला निघालेत, असा हल्ला काँग्रेसने चढवला. तर इकडे शिवसेनेने देखील पवारांना इशारा दिला आहे. पवारांची एवढी काय मजबुरी आहे की त्यांनी लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. असे असेल तर आम्ही शांत बसणार नाही, असेही राऊत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

शरद पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यास आम्ही सहन करणार नाही. मोदी-शाहांचे हात बळकट करणे हा महाराष्ट्रद्रोह आहे. हे विधेयक लोकशाहीचा गळा आवळणारं आहे. असे असतानाही त्यांनी पाठिंब्याची भूमिका घेतली असेल तर पवारांची राष्ट्रवादी कोणत्या तोंडाने इंडियाच्या बैठकीला जाणार? पवारांच्या सहकाऱ्यांनी माती खाल्ली, सत्तेत जाण्याची घाई काहींना झालीये, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

पवारांचा पक्ष नेहमी फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेतो. यापुढे आता त्यांना महापुरूषांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. सत्तेत जाण्याआधी शरद पवार यांच्या पक्षाने नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची माफी मागितली पाहिजे. कारण त्यांनी भाजपला अंगावर पक्षासाठी तुरूंगवास भोगला, असेही संजय राऊत म्हणाले.

शरद पवार यांचा इतिहास हा खंजीर खुपसण्याचाच; सत्तेसाठी जगायचं अन् सत्ता घेऊन मरायचं…

भाजपला साथ! शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने ऐनवेळी निर्णय बदलला…

मोठी बातमी! मतदारसंघ पुनर्रचनेला पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर; माझे दैवत…

मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाच्या विधेयकातील दुरुस्त्यांना मंत्रिमंडळाची मंजूरी…

राष्ट्रवादीनं काढला व्हिप, व्हिपमध्ये काय? खासदारांना काय आदेश…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!