नागपूर : संसदेच्या विशेष अधिवेशनात मतदारसंघ पुर्नरचना विधेयक अर्थात डिलिमटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने इंडिया आघाडीने ऐनवेळी निर्णय बदलला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत जहाल भाषेत टीका केली आहे. शरद पवार यांचा इतिहास हा खंजीर खुपसण्याचाच आहे. भाजपला साथ द्यायचा निर्णय बापलेकीने मिळून घेतलाय, सत्तेसाठी जगायचं अन् सत्ता घेऊन मरायचं एवढंच यांच्या डोक्यात असते, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
शरद पवार साहेब 86 वर्षांचे आहेत. संपूर्ण आयुष्य त्यांनी पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला. असा नेता जातीयवादी, धर्मांध शक्तींशी हातमिळवणी करुन त्यांच्यासोबत जाईल, असं कधीच वाटलं नव्हतं. पण पवारांचा इतिहासा हा खंजीर खुपसण्याचा आहे, हे महाराष्ट्रातील लोकांन माहिती आहे. अनेकदा तशी परिस्थिती आली तेव्हा हे दिसून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेसाठीच बनला आहे. सत्तेशिवाय जगणं या पक्षाला मान्यच नाही, त्यांना कुठलाही विचार नाही, हे सिद्ध झाले आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
View this post on Instagram
आम्ही सगळ्यांनी मिळून शरद पवार यांना 85 व्या वर्षी राज्यसभेवर पाठवले. त्यांच्या रुपाने राज्यसभेत फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार राहिला पाहिजे, हे त्यामागील कारण होते. पण आता हा विचार संपवण्याचे काम शरद पवार यांनीच केले आहे. डिलिमिटेशनंतर देशात जी परिस्थिती निर्माण होईल, लोकशाही संपवण्याच्या ज्यांचा वाटा आहे, त्यांची यादी निघेल, त्यामध्ये शरद पवार यांचे नाव असेल, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
डिलिमिटेशन विधेयक मंजूर झाल्यावर संविधान संपेल, लोकशाही संपेल, उद्या देशात निवडणुकाच होणार नाहीत. डिलिमिटेशनमुळे देशात हुकुमशाही येईल. शरद पवार यांच्या पक्षाचा निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. 10 आमदारांच्या बळावर सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्रिपद मागणे हे हास्यास्पद आहे. भाजपने शिंदे गटाकडे 60 आमदार असताना त्यांना मुख्यमंत्रीपद दिले नाही. पण सुप्रिया सुळे डिलिमिटेशनला पाठिंबा देणार असतील म्हणून त्यांना भाजप मुख्यमंत्री बनवणार असेल तर आनंद आहे, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
भाजपला साथ! शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने ऐनवेळी निर्णय बदलला…
मोठी बातमी! मतदारसंघ पुनर्रचनेला पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर; माझे दैवत…
मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाच्या विधेयकातील दुरुस्त्यांना मंत्रिमंडळाची मंजूरी…
राष्ट्रवादीनं काढला व्हिप, व्हिपमध्ये काय? खासदारांना काय आदेश…
One thought on “शरद पवार यांचा इतिहास हा खंजीर खुपसण्याचाच; सत्तेसाठी जगायचं अन् सत्ता घेऊन मरायचं…”