नवी दिल्ली: मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation Bill) आणि महिलाआरक्षणाशी (women reservation) संबंधित घटनादुरुस्ती विधेयकातील दुरुस्त्यांना कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मोदींच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी (डिलिमिटेशन) संबंधित घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे. यामध्ये विविध राज्यांमधील जागांची संख्या 50 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यांमध्ये जागांच्या वाटपाची सध्याची व्यवस्था पुढील 25 वर्षांपर्यंत, म्हणजेच 2051 सालापर्यंत, कायम राहील. याच पार्श्वभूमीवरती केंद्र सरकार आणत असलेल्या डिलिमिटेशन बिलाला पाठींबा मिळावा यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यासोबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा संपर्क केला असल्याची माहिती आहे. पुढील काही दिवसांत हे बिल आणले जात आहे, त्यावेळेस सर्व सहकार्य मिळावे यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या नेत्यांसोबत संवाद करून शंका दूर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
View this post on Instagram
मोदी सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज (शुक्रवार) पार पडली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संसदेच्या आगामी कामकाजावर चर्चा करण्यात आली. सूत्रांनुसार, बैठकीत ‘डीलिमिटेशन बिल’ (परिसीमन विधेयक) मंजूर करण्यात आले. याव्यतिरिक्त, महिला आरक्षणाशी संबंधित एक दुरुस्तीही मंजूर करण्यात आली आहे. लोकसभा 30 नोव्हेंबर रोजी, तर राज्यसभा 2 डिसेंबर रोजी बोलावण्यात आली आहे. दिल्ली पातळीवर आणि राज्य सरकारच्या पातळीवरती घडामोडींना वेग आला आहे, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना संपर्क केला असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाशी आता भाजपचे वरिष्ठ नेते संपर्क साधत आहेत. याआधी देखील संपर्क करण्यात आला होता, हे विधेयक पास व्हावं यासाठी भाजपकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. तर हे विधेयक पास करताना कोणकोणते पक्ष पाठिंबा देऊ शकतात त्यांना संपर्क केला जात आहे, तर या विधेयकाची माहिती जाणून घेतल्यानंतर त्याला पाठिंबा देण्याबाबत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे संकेत गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे.
संसदेचे चार दिवसीय अधिवेशन आहे, यामध्ये महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हे स्वतंत्र हिवाळी अधिवेशन नसून पावसाळी अधिवेशनाचाच पुढील भाग असणार आहे. 30 नोव्हेंबरपासून लोकसभेचे तर 2 डिसेंबरपासून राज्यसभेचे कामकाज सुरू होणार आहे. तर 3 डिसेंबरला अधिवेशनाचा समारोप होणार आहे. सरकारकडून अद्याप अधिवेशनाचा अधिकृत कामकाजाचा अजेंडा जाहीर झालेला नाही. अधिवेशन बोलावण्याच्या पद्धतीवरून घटनादुरुस्ती विधेयक आणण्याची सरकारची तयारी असल्याचे स्पष्ट संकेत यावरून दिसून येत आहेत.
विधेयक घटनादुरुस्ती विधेयक असल्यामुळे आवश्यक संख्याबळ 360-
भाजप: 241
तेलुगू देसम पक्ष: 16
शिवसेना (एकनाथ शिंदे): 13
जनता दल (युनायटेड) : 12
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) : 5
जनता दल (धर्मनिरपेक्ष) : 2
जनसेना पक्ष : 2
राष्ट्रीय लोकदल (RLD) : 2
अपना दल (एस) : 1
आसाम गण परिषद : 1
एजेएसयू पक्ष : 1
हिंदुस्तानी अवाम मोर्चा : 1
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) : 1
सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा : 1
यूपीपीएल : 1
एनसीपीआय (तृणमूलमधून बाहेर पडलेले) : 20
शिरोमणी अकाली दल : 1
एकूण 321
एनडीएबाहेरील संभाव्य समर्थक (मागील वेळी मदत केलेले)
वायएसआर काँग्रेस – 4
अपक्ष – 1
हे धरून एकूण संख्याबळ – 326
द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), यांचे समर्थन मिळण्याची शक्यता, ते मिळाल्यास
द्रमुक – 22
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – 8
एकूण संभाव्य म्हणजे एकूण संख्याबळ – 356
डिलिमिटेशन म्हणजे नेमकं काय?
डिलिमिटेशन (Delimitation) म्हणजे लोकसंख्येतील बदलानुसार लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या सीमा आणि जागांची संख्या पुन्हा निश्चित करण्याची घटनात्मक प्रक्रिया होय. भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, या प्रक्रियेला मराठीत ‘मतदारसंघ पुनर्रचना’ असे म्हणतात. नवीन जनगणनेची वाट न पाहता 2011 च्या जनगणनेच्या किंवा सरकारने निश्चित केलेल्या आकडेवारीच्या आधारे ही पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव या विधेयकात मांडण्यात आला आहे.
One thought on “मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाच्या विधेयकातील दुरुस्त्यांना मंत्रिमंडळाची मंजूरी…”