मुंबईः “नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं. तुझी लायकी किती तू बोलतो किती” असे ट्विट शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केले होते. या ट्विटला आता भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
निलेश राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नवनाथ बन यांनी नारायण राणेंसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत ‘ज्युनिअर नवनाथ बन विथ सिनिअर लिडर नारायण राणे साहेब!’, अशी कॅप्शन लिहण्यात आली आहे. निलेश राणे यांनी नवनाथ बन यांच्यावर टीका करताना एकप्रकारे आपली राजकारणातील वरिष्ठता दाखवत बन यांना त्यांची जागा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता नवनाथ बन यांनी नारायण राणेंच्या बाजूला बसलेला फोटो शेअर करुन आपली उठबसही वरिष्ठ नेत्यांमध्ये असल्याचा संदेश दिला आहे.’
View this post on Instagram
नवनाथ बन यांनी गुरुवारी पत्रकारपरिषद घेऊन पुणे पदवीधर मतदारसंघातील पराभवाचे खापर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर फोडले होते. या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी नवनाथ बन यांना फटकरले आहे. पदवीधर लढत होता तुम्ही आम्हाला एकही संदेश पाठवला नाही. तरीही आम्ही सहकार्य केले. आम्हाला नवनाथ बनने शिकवू नये, काम कसे करायचे. अरे नवनाथ बन, याद राख, तुला रडायला पण वेळ देणार नाही, असा इशारा निलेश राणे यांनी दिला होता.
तुझी लायकी किती तू बोलतो किती! नवनाथ बन लायकीत राहायचं: निलेश राणे