नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान मंत्री लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अडणवाणी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. डॉक्टरांच्या देखरेखी खाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
लालकृष्ण अडवाणी (वय ९८) यांची तब्येत अचानक खालावल्यामुळे शुक्रवारी (ता. १६) रात्री दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यांच्या छातीमध्ये संसर्ग झाल्यामुळे दुखत असल्याची माहिती समोर आली आहे. हॉस्पिटलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अडवाणी यांच्या फुफ्फुस आणि श्वसनविकारांशी संबंधित उपचारा सुरू आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखी खाली उपचार सुरू आहे. डॉक्टरांची टीम अडवाणी यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. त्यांना मे महिन्यात अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते.
View this post on Instagram
दरम्यान, लालकृष्ण अडवाणी यांना आज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याआधी दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यांच्या तब्येची विचारपूस केली होती. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून त्यांच्या योगदानाबद्दल पोस्ट शेअर केली होती, त्यांच्या प्रकृतीबद्दल भावना व्यक्त केली होती.