ज्ञानेश कुमारांचा १० ऑक्टोबरपूर्वीच राजीनामा..? राहुल गांधींच्या आंदोलनादरम्यान या नेत्याचा दावा…

Share

नवी दिल्लीः केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आज धरणे आंदोलन केले. दरम्यान आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार हे १० ऑक्टोबरपूर्वीच राजीनामा देतील, असा दावा आम आदमी पक्षाचे नेते आणि पक्षाचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये केला आहे.

दरम्यान, १० ऑक्टोबरला दिल्लीतील जंतरमंतरवर अभिजीत दीपके यांची कॉकरोच जनता पार्टी आंदोलन करणार आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दीपके आक्रमक आहेत. अशास्थितीत ज्ञानेश कुमार हे १० ऑक्टोबरपूर्वी त्यांच्या पदाचा राजीनामा देतील, असा दावा सौरभ दास यांनी केला आहे. इंडिया आघाडातील नेत्यांही असे दावे केले आहेत. त्यांच्या या दाव्यांमुळे निवडणूक आयोगाभोवतीचे राजकीय वादळ अधिकच तीव्र झाले आहे.

विरोधी पक्ष बिहार आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमधील विशेष सखोल पुनरीक्षणासंदर्भात निवडणूक आयोगाला सातत्याने लक्ष्य करत आहेत. विरोधी पक्षांचा आरोप आहे की, मतदार यादीच्या या विशेष पुनरीक्षणादरम्यान मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळली जात आहेत किंवा समाविष्ट केली जात आहेत. मात्र, निवडणूक आयोग आपल्या कार्यपद्धती आणि नियमांचा हवाला देऊन हे आरोप खोडून काढत आहे.

गेल्या १० महिन्यांत १४ वेळा इतर दोन निवडणूक आयुक्तांची मते ज्ञानेश कुमार यांच्या मतांपेक्षा वेगळी होती, असा दावा एका माध्यम अहवालात करण्यात आल्यानंतर हा वाद वाढला. याच्या आधारावर, सरन्यायाधीशांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर मनमानी केल्याचा आरोप केला आहे.

सरन्यायाधीशांचे म्हणणे आहे की, निवडणूक आयोगामध्ये निर्णयांसंदर्भात मतभेद निर्माण होत असतील, तर त्याची गंभीर चौकशी झाली पाहिजे. ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि एसआयआर प्रक्रिया थांबवावी, अशी पक्षाची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!