पुढच्या निवडणुका EVM वर नको, बॅलेट पेपरवर घ्या : राज ठाकरे

raj-thackeray
Share

मुंबई : यापुढे सर्व निवडणुका व्होटिंग मशिनवर न घेता पुन्हा बॅलेट पेपरवरच घेण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन मोठं आंदोलन उभं केले पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. मतदारयादीच्या विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) प्रक्रियेवरून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यपद्धतीवरून उफाळलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहिली आहे.

“ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत. गेले २ दिवस ज्ञानेश कुमार हे गप्प झालेत आणि त्यांना बोलतं करणारे पण कुठेच दिसत नाहीयेत. ज्ञानेश कुमार यांच्यासारख्याना हाताशी धरून आपण कसे सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोत हे भारतीय जनता पक्ष सांगत होतं हे लक्षात आले असेल. आणि यासाठी त्यांनी २०२५ पासून एसआयआर हे नवं अस्त्र हाती घेतले आहे.” असे राज ठाकरे पोस्टमध्ये म्हणतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

“एसआयआरमध्ये काय घोळ झालेत आणि यावर निवडणूक आयुक्तच बोलत आहेत हे बघितल्यावर, एकच पर्याय दिसतो तो म्हणजे ही एसआयआरची संपूर्ण प्रक्रियाच रद्द केली गेली पाहिजे. आणि यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही मागणीच आहे की आत्ता झालेलं एसआयर पूर्ण रद्द करा, त्यात कसे घोळ झाले याची निष्पक्ष चौकशी करा आणि नव्याने ही प्रक्रिया करा.” अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

“यापुढे सर्व निवडणुका व्होटिंग मशिनवर न घेता पुन्हा बॅलेट पेपरवरच घेण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे ! तरच इतक्या वर्षांच सत्तेचं सत्य बाहेर येईल !” असंही राज ठाकरे म्हणतात.

दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी आयोग आणि भाजपला लक्ष्य केले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे ‘देशद्रोही’ आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. ज्ञानेश कुमार यांनी मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणीही राहुल यांनी पत्रकार परिषेत केली. ‘मोदी, शहा आणि ज्ञानेश कुमार यांना चौकशीला सामोरे जावे लागेल. त्यावेळी ज्ञानेश कुमार यांनी ‘माफीचा साक्षीदार’ बनावे, असे राहुल म्हणाले.

मतं चोरणाऱ्यांना आज ना उद्या शिक्षा करणारच : राहुल गांधी

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याची वकिलाने मागितली परवानगी

पुणे महापालिकेच्या ‘कर्तव्यदक्ष’ अधिकाऱ्यांचा अजब कारभार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!