पुणे: पुणे शहरात गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला विरोध करत डीजेवर (DJ) बंदी घालण्याची मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर टिळक रस्त्यावर हल्ला झाला. या घटनेनंतर अवघ्या तीन तासांत पुणे क्राईम ब्रँचने आरोपी संतोष चव्हाण याला अटक केली. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले, ‘सण हा सुखद आणि लोकांना आनंद देणारा असला पाहिजे. डीजेचे आवाज आणि त्यावर रस्त्यांवरील कार्यक्रम यामुळे सणाचे गांभीर्य कमी होत जाते. विद्यानंद बापट यांना मी ओळखत नाही. परंतु, त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा योग्य आहे. गणेशोत्सवाची परंपरा आहे. मात्र, उत्सवातील चुकीच्या गोष्टीवर बापट मत व्यक्त करत आहेत. त्यांच्या भूमिकेला माझं समर्थन आहे. कोणीतरी या संदर्भात मत व्यक्त केलं म्हणून त्यांच्यावर हल्ला करणं हा लोकशाहीवर हल्ला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त आणि इतर घटक आहेत त्यांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. बापटांच्या हल्ल्याचा निषेध करणाऱ्यांच्या मी सोबत आहे. हल्ले थांबायला पाहिजेत, नाहीतर सक्तीचे धोरण स्वीकारले पाहिजे. सोलापूरने डीजेबाबत निर्णय घेतला, असे निर्णय घ्यायची आवश्यकता आहे.’

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, ‘या गलिच्छ कृतीचा मी जाहीर निषेध करते. माझं विद्यानंद बापट यांच्याशी सविस्तर बोलणं झालं आहे. मी स्वतः माझ्या ओळखीतले वकील त्यांच्या मदतीला तातडीने पाठवत आहे. ही गलिच्छ प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे. माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की, सातत्याने यात पुण्याची बदनामी होत आहे. राज्याची देखील बदनामी होत आहे. या गलिच्छ प्रवृत्तीच्या मागे कुठली अदृश्य शक्ती आहे? एखादी व्यक्ती जर आपले मत मांडत असेल तर तुम्ही त्याला येऊन मारहाण करणार का? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मी याचा जाहीर निषेध करते. माणुसकीच्या नात्याने आम्ही बापटांच्या मागे ताकदीने उभे राहणार.’
अजित पवार विमान अपघाताच्या तपासात प्रगती न झाल्याबद्दल सुप्रिया सुळे यांची नाराजी…
शरद पवार यांच्याकडून १० प्रवक्त्यांची यादी जाहीर; पाहा नावे…
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी राहुल गांधी, शरद पवार उतरले राजकीय मैदानात…
One thought on “पुणे शहरात विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्यानंतर शरद पवार म्हणाले…”