रोहित पवार यांची प्रकृती बिघडली, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल…

rohit-pawar
Share

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने उपचारासाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या विशेष देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी वांद्रे येथील एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) कार्यालयात जाऊन आयुक्तांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. मात्र, ही बैठक पार पडल्यानंतर काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि शारीरिक त्रास जाणवू लागला. त्रास वाढल्यानंतर तात्काळ त्यांना उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

डॉक्टरांच्या पथकाने त्यांची प्राथमिक तपासणी केली असून, त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या व उपचार सुरू आहेत. रोहित पवार यांच्या रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पवार यांच्या प्रकृतीबाबत पुढील अधिकृत माहिती लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल…

खासदार निलेश लंके यांची प्रकृती खालावली…

शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *