मुंबईः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी गुरुवारी रात्री उशिरा जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली. जवळपास तासभर दोन्ही नेते नंदनवनवर होते भेटीदरम्यान फक्त जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होणार अशा चर्चा असताना ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील झाल्यास जयंत पाटील यांना अर्थमंत्री पद मिळणार, या चर्चेला आणखी बळकटी मिळाली असून त्याच संदर्भात कालच्या बैठकीत तिन्ही नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, मागील दोनच दिवसांच्या आत जयंत पाटील यांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात काही मोठं घडणार आहे का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!
मंगळवारी रात्री अचानक सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी जयंत पाटीलही त्याठिकाणी गेले होते. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत सामील होणार, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, वर्षा बंगल्यावरील या बैठकीची माहिती सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना नसल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर बुधवारी सुनील तटकरे यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन सुनेत्रा पवार यांना भेटीबाबत माहिती दिली होती. मात्र, जयंत पाटील यांच्या भेटीबाबत आपल्याला माहिती नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या एनडीएतील समावेशाबाबत वर्षा बंगल्यावरील बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. आम्ही संसदेत मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देऊन हे आश्वासन देण्यासाठी जयंत पाटील बैठकीला आल्याचे सांगण्यात येते. मात्र, या सगळ्याबाबत सुनेत्रा पवार अनभिज्ञ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यामुळे बुधवारी रात्री पार्थ पवार यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी फडणवीसांनी यापुढे घटकपक्षांच्या नेत्यांसोबत कोणतीही बैठक असल्यास राष्ट्रीय अध्यक्षाला कळवले जाईल, असे आश्वासन सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना दिल्याची माहिती आहे.