बुलढाणा: ‘ऑपरेशन टायगर-२’ च्या यशानंतर आता ‘ऑपरेशन टायगर-३’ ची चर्चा सुरू झाली आहे. ऑपरेशन टायगर-३ मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे १४ आमदार फुटणार असल्याची चर्चा आहे. अशातच ठाकरे गटाच्या विदर्भातील आमदाराची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे कोणते १४ आमदार फुटणार आणि शिंदे गटात प्रवेश करणार, यावर चर्चा सुरू आहेत. अनेकांकडून अंदाज व्यक्त केले जात असताना आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांची पोस्ट चर्चेत आली आहे.
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच ६ खासदार फोडून एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवून दिली होती. सध्या उद्धव ठाकरे हे शिंदे गटात गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे या सभांमध्ये व्यस्त असतानाच, मुंबईत त्यांच्या उरलेल्या आमदारांचा एक मोठा गट पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे एकमेव आमदार सिद्धार्थ खरात यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या फेसबुक पोस्टचा चुकीचा अर्थ लावून, ठाकरे गटाचे तीन आमदार शिंदे गटाच्या गळाला लागल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. खरात यांच्या पक्षबदलाच्या अफवांना उधाण आल्यानंतर अखेर आज त्यांनी स्वतः समोर येत या सर्व चर्चा फेटाळून लावल्या.
फेसबुकवरील पोस्ट चर्चेत आल्यानंतर आमदार खरात यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “कितीही संकटे आली, तरी मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. मी माझ्या मतदारांचा आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात करणार नाही,” अशा शब्दांत मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना त्यांनी पूर्णपणे पूर्णविराम दिला आहे.
आपल्या फेसबुक पोस्टचा नेमका अर्थ समजावून सांगताना आमदार खरात म्हणाले, “केवळ अडीच महिन्यांच्या अल्प कालावधीत मेहकर मतदारसंघातील जनतेने आणि मतदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर असलेल्या अथांग विश्वासामुळे मला निवडून दिले आहे. त्यामुळे माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या मायबाप जनतेशी आणि नेतृत्वांशी प्रतारणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”
दरम्यान, आमदार सिद्धार्थ खरात यांनी दाखवलेल्या या राजकीय खुद्दारीमुळे बुलढाण्यातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना आता पूर्णपणे पूर्णविराम मिळाला आहे.
ऑपरेशन टायगर २ आणि 3 होणार; शिवसेना खासदाराच्या दाव्याने खळबळ…