गिरीश महाजन यांनी फोटोबाबात पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितलं…

girish-mahajan
Share

मुंबईः राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची एका युवतीसोबतची काही आक्षेपार्ह छायाचित्र नुकतीच सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. या छायाचित्रांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. गिरीश महाजन यांच्यासोबतची ही युवती कोण, असा प्रश्न अनेकांना पडला होता. यावर अखेर गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. गिरीश महाजन यांचे विशेष कार्य अधिकारी अमोल पाटील यांनी यासंदर्भात मुंबईत पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. हे सर्व फोटो इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरुन काढून टाकण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

सायबर पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, फोटोशॉपद्वारे गिरीश महाजन यांचे त्यांच्या मित्राच्या मुलीसोबतचे फोटो मॉर्फ करून बदनामी करण्यात आली आहे. नोडल सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इन्स्टाग्राम व एक्स पोस्ट वरून मॉर्फ केलेले फोटो काढून टाकावेत. तसेच फोटो शेअर केलेल्या हँडल्सवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जलसंपदामंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अमोल पाटील यांनी केली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

मला माहिती नाही हे फोटो कसे मॉर्फ करण्यात आले. मी याबाबत सविस्तर खुलासा करणार आहे. मी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. फोटो मॉर्फिंग करुन ते दाखवले जात आहेत. सेल्फी दाखवले जात आहेत. पण ते मॉर्फिंग केलेले आहेत. मी यासंदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. मी यावर सविस्तर खुलासा करेन, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

मंत्री गिरीश महाजन यांचे AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केलेले अथवा मॉर्फ केलेले बनावट फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक अरविंद देशमुख यांच्या तक्रारी वरून जळगाव सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 17/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 356, 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 66(C) आणि 67 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका फेसबुक खात्यावरून गिरीश महाजन यांचे AI-निर्मित अथवा मॉर्फ केलेले फोटो वापरून आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आला होता. प्राप्त तक्रारीची पडताळणी केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, संबंधित फेसबुक खाते चालविणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मंत्री गिरीश महाजन यांच्यावर महिला एवढी का संतापली; नेमकं कारण काय…

महिला संतापली! गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुख्यमंत्र्यांबद्दल एकेरी उल्लेख चुकीचा! पहिलीच टर्म शेवटची ठरू शकते; गिरीश महाजनांचा सुहास बाबरांना इशारा

महिला पोलिसाने गिरीश महाजन यांना विचारला जाब, सस्पेंड केलं तरी चालेल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *