…आता आमचे ऑपरेशन तुडवा सुरू होणार : संजय राऊत

sanjay-raut
Share

नवी दिल्ली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज (गुरुवार) बोलाविलेल्या बैठकीला तीन खासदार उपस्थित राहिले. जे खासदार उपस्थित नव्हते त्यांना आम्ही नोटीस धाडली आहे. सात दिवसांच्या आत त्यांना उत्तरे देणे बंधनकारक आहे. परंतु फुटीरतावाद्यांसोबतची लढाई आता संसद, न्यायालय आणि रस्त्यावर अशी तीन पातळ्यांवर होईल. आमच्या मेहनतीच्या बळावर हे लोक निवडून आले आणि बेशरमपणे दुसऱ्या पक्षात चालले. आम्हाला हे कदापि मान्य होणार नाही. आता आमचे ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे, असा उद्वेग शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखवला.

शिवसेना संसदीय पक्षाच्या बैठकीला सहा फुटीर खासदारांनी दांडी मारल्यानंतर संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी फुटीर खासदारांवर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. खासदार फुटले कसे असे आम्हाला विचारतात. माझ्याकडे अर्ध्या तासासाठी ईडी-सीबीआय द्या, सगळ्यात आधी गिरीश महाजन यांना फोडतो. नाही फोडले तर मग विचारा…. असा पलटवार संजय राऊत यांनी केला. नाशिकच्या कुंभमेळ्यात हिंदुत्वाच्या नावाने भ्रष्टाचार चाललाय, मी सगळं काढणार आहे, असा इशाराही राऊत यांनी दिला.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

पत्रकार ज्याला फूट म्हणतायत, त्याला आम्ही गद्दारी म्हणतोय, बेईमानी, बदमाशी म्हणतो. हे सगळे लोक पैशाने विकत गेलेले आहेत. दोन दिवसांपूर्वी रात्री मी १५ कोटींचा आरोप केला. फुटीर खासदारांना हॉटेल लीलामधून राजस्थानात नेले आहेत. त्यांची वैचारिक लढाई आहे मग ते लपून का राहतायेत? माझी अशी माहिती आहे की त्यांना आज राजस्थानात नेताना अजून १० कोटी दिले. म्हणजेच त्यांना एकूण २५ कोटी रुपये पोहोचले आहेत. फुटीर खासदारांना कुणापासून भीती आहे? मंत्री गिरीश महाजन म्हणाले, राऊतांजवळ राडे करणारे कोण उरले आहेत? हे काय राडे करणार वगैरे… मग त्यांना लपवताय कशाला…? गद्दारांशी राडे करायचे नाहीत, मग कुणाशी करायचे? गद्दारी पोसण्याचे काम महाजन यांच्यासारखे लोक करताहेत. गद्दारांना कोणती भाषा वापरायची? पोलिसांचे ताफे बाजूला ठेऊन या, मग तुम्हाला दाखवतो. गद्दारांच्या अंगावर एक चिंधीही राहणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी फुटीर खासदारांना दिला.

आमच्यात राडे करण्याची क्षमता नाही असे म्हणता मग त्यांना सुरक्षा का देता? असा सवाल राऊत यांनी भाजपला विचारला. प्रत्येक गद्दाराला सुरक्षा हवी कशाला? त्यांची सुरक्षा काढा, त्यांच्या अंगावर चिंधी राहणार नाही. तुमचा बॉस एकनाथ शिंदे…. ५० गाड्यांचा ताफा घेऊन फिरतात, त्यांना कुणापासून भीती…. आमच्यापासून भीती नाही ना… मग कशाला सुरक्षा हवी? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

रामदास कदम यांचा ठाकरे यांना टोला; पक्षात तिघेच राहणार, देखो आगे क्या होता है…

उद्धव साहेब खचणारे नाहीत, विरोधकांच्या छातीवर पाय ठेवून उभे राहतील…

ऑपरेशन टायगर! शिंदे गटाच्या वाटेवर असण्याची शक्यता असणाऱ्या खासदारांची पाहा नावे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *