EVM मधील गडबड सुप्रीम कोर्टात पोहोचताचं भाजपनं मशिन्स जाळल्या : नाना पटोले

evm
Share

मुंबईः EVM ममधील गडबड सुप्रीम कोर्टात पोहोचताच भाजपनं मशिन्स जाळल्या आहेत, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. भाजप सरकारने पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीचा गळा घोटल्याचे पटोले म्हणाले. ना रहेगा बास ना बजेगी बासरी असे म्हणत पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रियेवर आणि ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेवर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगापासून ते संपूर्ण निवडणूक मॅनेजमेंट आणि ‘मॅच फिक्सिंग’ हे भाजपच्या बाजूनं करण्याचा प्रयत्न झाला. हे चित्र संपूर्ण देश आणि पश्चिम बंगालची जनता उघड्या डोळ्यांनी पाहत होती. हे संपूर्ण प्रकरण आता सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले आहे. ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार आणि गडबड करण्यात आल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. ही बाब आता लोकांसमोर उघड होत आहे, हे समजताच पश्चिम बंगालमधील पराभवाच्या छायेखाली असलेल्या भाजप सरकारनं ईव्हीएम मशिन्सच जाळून टाकल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा घातपात मुद्दाम घडवून आणला गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

भाजपच्या 2014 ते 2019 या काळातील फडणवीस सरकारनं 2016 मध्ये जाहीर केलेली कर्जमाफी ही निव्वळ फसवणूक होती, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. सरकार बदलले तरी अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण झालेली नाही, असे सांगत त्यांनी सध्याच्या सरकारच्या धोरणांवरही कडाडून टीका केली. शेतकऱ्यांकडून जबरदस्तीनं आधी एवढे पैसे भरा, मगच तुमची कर्जमाफी होईल अशा अटी घातल्या जात आहेत. यामुळे प्रत्यक्ष कर्जमाफ होण्याऐवजी शेतकऱ्यांच्या खिशातूनच पैसे काढून घेतले जात आहेत. ही अत्यंत क्लेशदायक बाब असून प्रत्यक्षात बँकांचे कर्ज माफ होताना कुठेही दिसत नाही, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.

विधानसभेत राडा! अशोक खरात याला भेटणाऱ्यांची HIV टेस्ट करा; अन्यथा…

रोहित पवार यांची प्रकृती खालावली; भूमिकेवर ठाम, म्हणाले…

चर्चांना उधाण! अजितदादा गेल्यानंतरचा पहिला वर्धपानदिन अन् रुपाली चाकणकर यांची दांडी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *