मुंबई: पाच राज्याच्या निवडणूक निकालांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्रात मोठी घडामोड झाली. राज्यातील सत्तेत महायुती म्हणून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र आहेत. मात्र, त्यांच्यातील परस्पर कुरघोडी सुरू असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. अशातच आता महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. भाजपने शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक झटका दिला आहे.
राज्यातील महायुती सरकारमध्ये महामंडळांच्या अध्यक्षपदांवरून सुरू असलेल्या सुप्त संघर्षात अखेर भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. रिक्त असलेल्या राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी अॅड. संजय पुराणिक यांची नियुक्ती करून भाजपने हे महत्त्वाचे पद आपल्याकडेच ठेवले आहे. विशेष म्हणजे, या नियुक्तीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय हेवेदावे टाळण्यासाठी सरकारने या नियुक्तीबाबत प्रचंड गोपनीयता पाळली होती. ३ मे २०२५ रोजी सुशीबेन शहा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे पद चर्चेत होते. सुशीबेन शहा या मूळच्या काँग्रेसच्या आहेत. मात्र, त्यांनी काही महिन्यापूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता आणि त्या पक्षाच्या प्रवक्त्याही आहेत. मात्र, तरीही भाजपने हे पद मित्रपक्षाला न सोडता आपल्या ताब्यात ठेवल्याने महायुतीतील ‘मोठा भाऊ’ कोण, याचे संकेत दिल्याची चर्चा आहे.
सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा दिला राजीनामा; नियम काय सांगतो पाहा…
राज्य सरकारचा सिलिंग जमिनींसंदर्भात मोठा निर्णय…
रुपाली चाकणकर यांची बहीण गोत्यात, ईडीनं पाठवलं समन्स, धक्कादायक आकडा…
सुप्रिया सुळे म्हणाल्या; पवार यांच्या विरोधात निवडणूक लढणार नाही, मागच्या वेळेस…