शिमला: हिमाचल प्रदेशच्या तहसिलदार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओशिन शर्मा या एका खासगी कंपनीच्या उत्पादनाच्या जाहिरातीवरून पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांनी सोशल मीडिया अकाउंटवर एक प्रमोशनल व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये जिममध्ये जाणाऱ्यांसाठी उत्पादनाची जाहिरात केली जात होती. या वादानंतर ओशिन शर्मा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून व्हिडिओ काढून टाकला आहे. हे प्रकरण आता संबंधित विभागापर्यंत पोहोचले आहे.
खासगी कंपनीच्या उत्पादनाच्या जाहिरातीवरून ओशिन शर्मा यांची राज्य सरकारकडे तक्रार दाखल करण्यात आली. मुख्य सचिव संजय गुप्ता यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ओशिन शर्मा सध्या शिमलात तहसिलदार म्हणून कार्यरत आहेत.
View this post on Instagram
नागरिकांनी ओशिन शर्मा यांच्या प्रमोशनल व्हिडिओबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. नागरी सेवा आचार नियम 15 (1) चे उल्लंघन करते, जे सरकारी कर्मचाऱ्याला व्यवसाय किंवा इतर नोकरी करण्यास मनाई करते. मुख्य सचिव संजय गुप्ता यांनी या प्रकरणाबाबत तक्रार मिळाल्याची पुष्टी केली आहे आणि त्यांनी संबंधित विभागाला चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, ओशिन शर्मा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. त्यांचे फेसबुकवर 3.71 लाख आणि इन्स्टाग्रामवर 3.74 लाख फॉलोअर्स आहेत. युट्यूबवरही अंदाजे 65 हजार सबस्क्राइबर आहेत.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949