महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल आणि केमिस्ट असोसिएशनचा उपक्रम
पुणे : बदलत्या युगामध्ये स्पर्धेला स्पर्धेने उत्तर देण्यासाठी रविवारी (ता. २२) अभिनव कॉलेज ऑफ फार्मसी येथे फार्मसी मॅनेजमेंट कोर्सचे आयोजन करण्यात आले होते. या कोर्स आयोजन महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल (डीआयसी) व केमिस्ट्स असोसिएशन पुणे डिस्ट्रिक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. केवळ रजिस्टर फार्मासिस्ट व रिटेल फार्मसी असणाऱ्या फार्मासिस्टचा सहभाग या उपक्रमामध्ये होता. देशभरातील १५ लाखांहून अधिक सदस्यसंख्या असलेल्या अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ ऊर्फ आप्पासाहेब शिंदे व महाराष्ट्र स्टेट फार्मसी कन्सिल चे अध्यक्ष अतुल अहिरे, गणेश बंगळे, विजय पाटील, मनोहर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कोर्सचे आयोजन करण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पारख व सचिव अनिल बेलकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा संघटनेचे संचालक संजय बिबवे, संतोष शेडगे, सचिन कातोरे, रामभाऊ गायकवाड यांनी या कोर्सच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला. अभिनव संस्थेचे खजिनदार ध्रुव जगताप यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, फार्मसी मॅनेजमेंट करताना ‘शिवनिती’चा अवलंब दिशादर्शक ठरू शकतो.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
दैनंदिन फार्मसी मॅनेजमेंट करत असताना येणाऱ्या अडचणी व त्यातून योग्य तो मार्ग कसा काढावा यासंदर्भामध्ये डॉ. राजेंद्र पाटील व प्रो. प्रवीण जावळे यांनी ५० हून अधिक उपस्थित रजिस्टर्ड फार्मासिस्ट यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल तर्फे समन्वयक म्हणून योगेश काळे, डॉ. धनाजी सूर्यवंशी व सौ भारती जगताप यांनी काम पाहिले. यावेळी जिल्हा संघटनेचे सदस्य संजय बिबवे, संतोष शेडगे, सचिन कातोरे, आकाश जाधव, अलका मारणे रामभाऊ गायकवाड, अभिनव संस्थेचे खजिनदार धृव जगताप, फार्मसी कॉलेज च्या प्राचार्या तृप्ती ठुसे, संगीता देशपांडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. धनाजी सूर्यवंशी यांनी केले, सूत्रसंचालन शिवव्याख्याते राहुल उर्फ रायबा नलावडे यांनी केले तर आभार प्रदर्शन योगेश काळे यांनी केले.