मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरेंच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे मुंबईतील एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीला समर्थन जाहीर केले आहे.
रावराणे यांनी सांगितले की, “प्रभागातील विकासकामांसाठी निधी मिळवणे आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे हे माझे प्राधान्य आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाबाबत दिलेले आश्वासन पाहता महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.”
मुंबई महापालिकेत आता दोन्ही राष्ट्रवादी गट शिंदे गटाच्या पाठीशी एकत्र आले आहेत. त्यामुळे शिंदे गटाची ताकद महापालिकेत वाढली असून, भाजपसोबतच्या वाटाघाटी करताना हा गट अधिक बळकट होईल, अशी चर्चा आहे.ठाकरे गटासाठी हा निर्णय मोठा धक्का मानला जात असून, महापौर निवडणुकीत विरोधकांचा संख्याबळ कमी करण्याचा प्रयत्न आता अवघड झाला आहे.