पुणे : अजित पवार यांचे निधन होऊन ७२ तासही उलटले नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्रात नवीन सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. आज (शनिवार) सायंकाळी पाच वाजता अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीची बातमी समोर आल्यानंतर बारामतीत शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडवून दिली आहे. सुनेत्रा पवारांचा आज शपथविधी होणार आहे, याबाबत आपल्याला काहीच कल्पना नाही. त्यांनी पक्षांतर्गत तो निर्णय घेतला असावा, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर राज्यात नवा सत्तासंघर्ष सुरू झाला का? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे सुनेत्रा पवार शपथविधी घेण्यासाठी मुंबईत दाखल झाल्या असताना बारामतीत हालचालींना वेग आला आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद दिलं जात असल्याने पवार कुटुंबात खळबळ उडाली आहे. तीन पिढ्याचे नेते एकत्र आले आहेत. बारामतीतील शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या गोविंद बाग येथे पवार कुटुंबातील सदस्यांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर उपस्थित आहेत. या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले आहे. शरद पवार यांना विश्वासात न घेता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडत असल्याने आता याबाब विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत.
दरम्यान, शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणावर देखील भाष्य केले आहे. मागील चार महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा होती. अजित पवार आणि जयंत पाटील दोघंही यावर चर्चा करत होते. हा निर्णय अंतिम टप्प्यात आला होता. विलिनीकरणाची तारीख देखील ठरली होती. येत्या १२ तारखेला विलिनीकरणाचा निर्णय होणार होता, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.
शरद पवार यांच्या मोठ्या वक्तव्याने चर्चांना उधाण…
अरे वेड्यांनो, का अश्रू ढाळताय? मी तुमची ‘मॉक ड्रील’प्रमाणे गंमत करत होतो…