पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज (बुधवार) सकाळी बारामतीजवळ अपघात झाला असून, या विमान अपघातात अजित पवार (वय ६६) यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात शोककळा पसरली असून सगळ्याच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
धारदार आवाज आणि स्पष्टवक्तपणा असलेल्या अजित पवार यांची राजकीय कारकीर्द…
अजित पवार यांचा राज्याच्या राजकारणात गेल्या ४० वर्षांपासून वावर होता. धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता, रोखठोक भाष्य यामुळे अजित पवार चर्चेत कायम राहिले होते. अजितत पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये दाखल होणार होते. विमान लँडिंग वेळी हा अपघात झाला.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ६ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यामुळे अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत असणारे वैमानिक, सहकाऱ्यांचेही निधन झाले आहे. अजित पवार यांच्या विमानाचा लॅण्डिंगआधी भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाले असल्याची प्रथम माहिती समोर आली होती त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, डीसीजीएनं दिलेल्या माहितीत अपघातग्रस्त विमानातील सहाही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.