राज्यातील 29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; घ्या जाणून…

fadnavis-shinde-pawar
Share

मुंबईः राज्यातील 29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आज (गुरुवार) आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. 29 महापालिका सोडतीसाठी भाजपकडून महामंत्री राजेश शिरवडकर, ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनोज जामसुतकर, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटाकडून आनंद परांजपे उपस्थित होते.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

राज्यातील 15 महापालिकांवर महिला राज तर 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे. महिलांना असलेल्या 50 टक्के आरक्षणानुसार, 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला, तर 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होणार आहे. कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे, याबाबतची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे आहे.

महाराष्ट्रातील 29 महापौरपदांसाठी आरक्षण…
अनुसूचित जमाती – 1
अनुसूचित जाती – 3
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – 8
सर्वसाधारण – 17

कोणत्या महापालिकेसाठी कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण…

अ.क्र. – महानगरपालिकेचे नाव – आरक्षित प्रवर्ग (Reservation Category)
1 बृहन्मुंबई (BMC) सर्वसाधारण
2 ठाणे अनुसूचित जाती (एससी)
3 कल्याण-डोंबिवली अनुसूचित जमाती- एसटी (पुरुष)
4 नवी मुंबई सर्वसाधारण
5 वसई-विरार सर्वसाधारण
6 भिवंडी-निजामपूर सर्वसाधारण- महिला
7 मीरा-भाईंदर सर्वसाधारण
8 उल्हासनगर ओबीसी- महिला किंवा पुरूष
9 पुणे सर्वसाधारण
10 पिंपरी-चिंचवड सर्वसाधारण- महिला
11 नागपूर सर्वसाधारण
12 अहिल्यानगर ओबीसी- महिला
13 नाशिक सर्वसाधारण
14 छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण
15 अकोला ओबीसी-महिला
16 अमरावती सर्वसाधारण
17 लातूर अनुसूचित जाती (एससी)- महिला
18 नांदेड-वाघाळा सर्वसाधारण
19 चंद्रपूर ओबीसी- महिला
20 धुळे सर्वसाधारण
21 जळगाव ओबीसी- महिला
22 मालेगाव सर्वसाधारण
23 कोल्हापूर ओबीसी-महिला किंवा पुरूष
24 सांगली-मिरज-कुपवाड सर्वसाधारण
25 सोलापूर सर्वसाधारण
26 इचलकरंजी ओबीसी- महिला किंवा पुरूष
27 जालना अनुसूचित जाती (एससी)- महिला
28 पनवेल ओबीसी- महिला किंवा पुरूष
29 परभणी सर्वसाधारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *