भाजप उमेदवाराच्या मुलीला राष्ट्रवादीच्या महिलांनी केली मारहाण; कारण…

Share

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये एका मतदान केंद्रावर बोगस मतदान करत असल्याचा आरोप करत भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या मुलीला मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये प्रभाग क्रमांक एक मधील फुलेनगर येथील मतदान केंद्रात बोगस मतदान करत असल्याचा आरोप करत एका महिलेला आणि एका पुरुषाला मारहाण करण्यात आली. रचीता गौड जंगमपल्ली असे पीडित महिलेचे नाव आहे. मारहाण करण्यात आलेल्या रचिता या भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनिता गौड जंगमपल्ली यांची मुलगी आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

आपण धर्माबाद येथील मतदार असून मतदान केले. मात्र मतदान केंद्रात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण आपल्याला केली, असा आरोप रचिता यांनी केली. नंतर मुख्य रस्त्यावर आणून देखील रचिता आणि अन्य एका पुरुषाला मारहाण करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *