अजित पवार भरसभेत संतापले, थेट हातात माईक घेतला अन् म्हणाले…

ajit-pawar
Share

जालना: “मला पोलिसांना सगळ्यांना सांगायचं आहे, माझे जे उमेदवार आहेत, त्यांच्या खुर्च्या स्टेजच्या समोर लावा. मी सांगतोय आणि त्यांना इथं बसवा… अरे काढ ना ते… खुर्च्या घे… कळत नाहीये का?” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांसह कार्यकर्त्यांवर संतापताना दिसले.

अजित पवार आज जालना दौऱ्यावर आहेत. परतूर नगर परिषदेसाठी त्यांची आज सभा आहे. मात्र ही सभा सुरू व्हायच्या आधी अजित पवार थेट पोलिसांवरच संतापले. सभास्थळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बसवण्यासाठी खुर्च्या न दिल्याच्या कारणातून अजित पवारांचा संताप अनावर झाला. ते व्यासपीठावरून उठले आणि थेट हातात माईक घेऊन पोलिसांना झापले आहे. तसेच स्टेजच्या समोरच्या बाजुला खुर्च्या लावून उमेदवारांना बसण्यासाठी व्यवस्था करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे. अजित पवार यांचा हा व्हिडीओ आता समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी बारामतीमधून प्रचाराचा नारळ फोडला आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीसाठी जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला. मी साधू संत नाही. तुम्ही मला मतदान करा, मी तुमचं काम करतो. तुम्ही मला काट मारली तर मी तुम्हाला काट मारणार, अशा शब्दांत अजित पवार यांनी मतदारांसह बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांना इशारा दिला आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चहुबाजुने टीका होऊ लागली आहे. ते उमेदवारांना दमदाटी केल्याचा आरोप होऊ लागला आहे.

दरम्यान, माळेगाव येथील सभेमुळे अजित पवार आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडले असताना त्यांनी थेट सभास्थळी पोलिसांना सुनावलं आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *