राज ठाकरे यांचा शब्द जिव्हारी लागला अन् पिट्या भाईने भाजपमध्ये प्रवेश केला…

ramesh-pardeshi
Share

पुणे: अभिनेता रमेश परदेशी याने राज ठाकरे यांच्या मनसेची साथ सोडली असून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पिट्या भाईसोबतच पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांने भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडल्याचे दिसत आहे.

अभिनेता रमेश परदेशी याच्यासोबत पुण्यातील मनसे चित्रपट सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पिट्या भाईला राज ठाकरे यांनी झापल्यापासूनच तो नाराज असल्याची चर्चा रंगली होती. अखेर त्यानं मनसेची साथ सोडून भाजपचा झेंडा हाती घेतला. पण, पिट्या भाईनं उचललेल्या या पावलामुळे पुण्यात एका रात्रीतचं पुण्यात मनसे चित्रपट सेनेला मोठं खिंडार पडले आहे. भाजपचे प्रदेधाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिट्याभाई आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर मनसे चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

अभिनेता रमेश परदेशी भाजपात जाणार असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून रंगली होती. रमेश परदेशी याने आपल्या सोशल मीडियावर संघाच्या गणवेशातला एक फोटो पोस्ट केलेला. मी माझ्या विचारांसोबत असा मजकूर त्यानं या फोटोसोबत लिहिलेला. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यावर असताना पिट्या भाईच्या याच पोस्टवरून झाप झाप झापलं होते. त्यानंतर पुन्हा रमेश परदेशी याने सूचक पोस्ट केली. आपण नव्या जबाबदारीसाठी सज्ज असल्याचे त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. अखेर पिट्या भाईने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *