सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सरकारला घरचा अहेर…

Share

मुंबई : भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा अहेर दिला आहे. आपलं सरकार इंग्रजापेक्षाही वाईट आहे असा मेसेज जायला नको, त्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवून घेत, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भारतरत्न मागणीचा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत केली. मुनगंटीवार यांच्या या भूमिकेची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये असते, विदर्भातील प्रश्नांना प्राधान्य देत हे अधिवेशन नागपूरला घेतले जाते. त्याच पार्श्वभूमीवर आज विधिमंडळ कामकाज समितीची बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारपुढे आपली मागणी आग्रहाने मांडली. मात्र, त्यांची मागणी मान्य झाली नसल्याचे दिसून आले. नेहमीप्रमाणे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरला सुरू होईल, दोन आठवड्यांसाठीच्या कामकाजाला आज मान्यता देण्यात आली आहे. कामकाजामध्ये आवश्यक असेल तर अधिवेशन वाढवण्याच्या दृष्टीने विचार केला जाईल, अशी माहिती भाजप नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. अधिवेशन दोनऐवजी तीन आठवड्यांचं घ्यावं, यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी आग्रह धरला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांऐवजी तीन किंवा चार आठवड्याचं घ्यावं अशी मागणी केली. जर असं केलं नाही तर सावरकरांनासुद्धा न्याय मिळू शकत नाही, असे म्हणत सावरकर यांना भारतरत्न देण्यासंदर्भातील विषयाकडे सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले. तसेच, इंग्रजांपेक्षा आपलं सरकार वाईट आहे असा मेसेज जाऊ नये म्हणून अधिवेशन कालावधी वाढवून आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारा प्रस्ताव देखील याच अधिवेशनात मंजूर करुन घ्यावा, अशी मागणी देखील सुधीर मुनगंटीवर यांनी केली आहे. दरम्यान, दोन आठवड्यांचे अधिवेशन कामकाजासाठी कमी पडल्यास आणखी काही दिवस वाढवण्याचा निर्णय घेण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक घेतली जाईल, असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितले आहे.

सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची पानं टराटरा फाडताना शायना थांबल्या अन् चावली जीभ…

चर्चांना उधाण! रोहित पवार यांनी मफलरमॅन म्हणून दाखवला फडणवीसांचा फोटो…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!