अमेरिकेचे पहिले मुस्लिम सिनेटर, डॉ. अब्दुल सय्यद यांनी केली दिवाळी साजरी

Share

न्यूयॉर्कः अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमधील सर्वात प्रमुख व्यक्तिमत्व आणि अमेरिकी सिनेटचे पहिले मुस्लिम सदस्य, डॉ. अब्दुल अल-सय्यद यांनी दिवाळी साजरी केली. त्यांनी याची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. डेमॉक्रॅटिक पक्षाचे सदस्य असलेले अब्दुल यांनी नुकतीच मिशिगनमधून मध्यावधी निवडणुकीत विजय मिळवला आहे. परिणामी, त्यांच्या भारताशी असलेल्या संबंधांची चर्चा सुरू झाली आहे.

त्यांच्या पत्नी, डॉ. सारा झुक्काकू, या दक्षिण भारतातील एका राजकीय कुटुंबातील आहेत. त्यांचे आजोबा म्हैसूर सरकारमध्ये (सध्याचे कर्नाटक) महत्त्वाच्या पदांवर होते.

व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अब्दुल यांनी दोन छायाचित्रे शेअर केली आहेत. एका छायाचित्रात ते एकटे दिसत आहेत, तर दुसऱ्यामध्ये ते इतरांसोबत समईची ज्योत पेटवताना दिसत आहेत. त्यांनी गळ्यात हारही घातला आहे. इन्स्टाग्रामवर छायाचित्रे शेअर करत, अब्दुल यांनी दिव्यांचा सण साजरा करणाऱ्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अब्दुल यांची पत्नी सारा ही भारतातील कर्नाटक राज्यातील उत्तर कर्नाटक जिल्ह्यातील भटकळ या किनारपट्टीच्या शहरातील रहिवासी आहे. तिचे कुटुंब भटकळच्या नवायथ मुस्लिम समाजाचे आहेत. साराचे आजोबा, जे. एच. शम्सुद्दीन जुकाकू, हे त्यांच्या काळातील एक नामांकित वकील होते आणि त्यांनी १९५० च्या दशकात तत्कालीन म्हैसूर राज्य सरकारमध्ये उप-अर्थमंत्री म्हणून काम पाहिले होते. तिचे वडील, तय्यब जुकाकू, हे एक नेफ्रोलॉजिस्ट (मूत्रपिंड तज्ज्ञ) आहेत, जे १९८० च्या दशकात अमेरिकेतील मिशिगन येथे स्थलांतरित झाले.

न्यूयॉर्क शहरातील झोहरान क्वामे ममदानी यांनीही एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ते त्यांच्या निवासस्थानी दिवाळी साजरी करताना दिसत आहेत. त्यांनी रांगोळी काढली आणि दिवे लावले. त्यांनी ‘एक्स’ वर लिहिले आहे, की न्यूयॉर्क शहर, तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!