तुझी लायकी किती तू बोलतो किती! नवनाथ बन लायकीत राहायचं: निलेश राणे

nilesh-rane
Share

मुंबईः राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद पेटला आहे.

राज्यातील पाच जागांवर विधानपरिषदेची निवडणूक झाली होती. यामध्ये महाविकास आघाडीने पदवीधरच्या 3 पैकी 3 जागा जिंकल्या, सत्ताधारी महायुतीने शिक्षक मतदारसंघाच्या दोन्ही जागा जिंकल्या. परंतु पाच पैकी फक्त दोन जागा मिळाल्याने महायुतीत सध्या अंतर्गत वाद पेटला आहे. पुण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने साथ न दिल्याने भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. शिवसेनेच्या भूमिकेने महायुतीच्या गणिताला सुरुंग लावल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला होता. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आक्रमक झाले होते. त्यांनी नवनाथ बन यांना प्रत्युत्तर देणे सुरू केले. या सगळ्या वादात आता निलेश राणे यांनीही उडी घेतली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार असलेल्या निलेश राणे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामधून त्यांनी नवनाथ बन यांच्यावर निशाणा साधला. नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं. तुझी लायकी किती तू बोलतो किती, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत निर्माण झालेला विसंवाद वाढवू नका, अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिली आहे. निवडणुकीतील निकालांचे महायुती म्हणून आत्मपरीक्षण करा, झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळा, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. युतीत वितुष्ट निर्माण होणार नाही आणि अंतर्गत वादाचा फायदा विरोधकांना मिळणार नाही, याची खबरदारी घ्या. महायुती म्हणून काम करताना झालेल्या चुका आणि त्रुटींचा सविस्तर अहवाल स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आला असून महायुती समन्वय समिती आणि वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. तूर्तास शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर मित्रपक्षांवर टीका करू नये. विसंवाद टाळून एकजुटीने पुन्हा कामाला लागण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

मोठी बातमी! नितेश राणे यांना एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा…

हिंदूंनी हिंदूंकडूनच वस्तू घेतल्या पाहिजे: नितेश राणे

नितेश राणे यांची बंडखोर उमेदवाराला भरसभेत धमकी; म्हणाले…

One thought on “तुझी लायकी किती तू बोलतो किती! नवनाथ बन लायकीत राहायचं: निलेश राणे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!