चंद्रपूर : शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांना चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस पोलिसांनी आवाजाचे नमुने देण्यासाठी नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये बच्चू कडू यांना 26 ऑक्टोबरला घुग्गुस पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावून आवाजाचे नमुने देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
स्थानिक भूमिपुत्रांना वेकोलिमध्ये 80 टक्के नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावे, यासह इतर मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी 18 तारीख म्हणजेच रविवारी एक मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चादरम्यान विनापरवानगी मोर्चा काढणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि भाषणादरम्यान पोलीस प्रशासन व तहसीलदारांविषयी अत्यंत प्रक्षोभक, अश्लील वक्तव्य करून धमकी दिल्याप्रकरणी माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांच्यासह सहा जणांवर या आधीच घुग्घुस पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनी पोलीस प्रशासन आणि तहसीलदार यांच्या विरोधात वापरलेल्या आक्षेपार्ह भाषणासाठीच आता चंद्रपूर पोलीस बच्चू कडू यांच्या आवाजाचे नमुने गोळा करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता बच्चू कडूंच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
दरम्यान, शिवसेना नेते आणि आमदार बच्चू कडूंसह सहा जणांवर घुग्घुस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवानगी आंदोलन व पोलिसांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक भूमिपुत्रांना वेकोलिमध्ये 80 टक्के नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावे, यासह इतर मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी 18 तारीख म्हणजेच रविवारी एक मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चादरम्यान विनापरवानगी मोर्चा काढणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि भाषणादरम्यान पोलीस प्रशासन व तहसीलदारांविषयी अत्यंत प्रक्षोभक, अश्लील वक्तव्य करून धमकी दिल्याप्रकरणी माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांच्यासह सहा जणांवर घुग्घुस पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार बच्चू कडू (रा. बेलोरा, अचलपूर, अमरावती), शिवसेना (शिंदे) चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा संघटक मुकेश मनोजराव जिवतोडे (रा. वरोरा), रोशन राजाराम हरबडे (रा. नांदा फाटा, कोरपना), अमोल नथ्थूजी मांढरे (रा. घुग्घुस), नथ्थू भाऊराव नवले (रा. नकोडा, घुग्घुस), सतीश बीडकर (रा. गडचांदूर) यांच्यावर बीएनएस 2023 मधील कलम 190, 191(2), 296, 223, 224, 351(2) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 135 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांची वादग्रस्त घोषणा…
घरी बोलावून त्याला मंत्री केलं ही माझी चूक झाली: उद्धव ठाकरे