राहुल गांधी यांच्याकडे दूरदृष्टी नाही; काँग्रेसचाही त्यांच्यावर विश्वास नाही – शिवराज चौहान

Share

नवी दिल्लीः भारत आघाडी राहुल गांधींना आपला नेता म्हणून स्वीकारायला तयार नाही आणि खुद्द काँग्रेसचाही राहुल गांधींवर विश्वास नाही, असे भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिवराज चौहान यांनी सांगितले. इंडी अलायन्सच्या बैठकीला प्रमुख मित्रपक्षांची अनुपस्थिती, यामुळे आघाडीतील एकतेचा अभाव उघड झाला आहे. त्यांच्याकडे दूरदृष्टी किंवा एकजूट करण्याची क्षमता नाही. केवळ निराशा आणि पराभवासाठी तयार केलेली कारणे आहेत, असेही चौहान यांनी सांगितले.

अलायन्सच्या लोकशाही वाचवा मोर्चाला ‘राजघराणे वाचवा मोर्चा’ संबोधतात, असे सांगून चौहान म्हणाले, की स्वच्छ मतदार यादी हा लोकशाहीचा आत्मा आहे. जर एखादी व्यक्ती देशाची नागरिकच नसेल, तर तिचे नाव मतदार यादीत का असावे? मृत व्यक्तींची, दुबार नोंदींची आणि बिगर-नागरिकांची नावे वगळण्यास विरोध करणे हे लोकशाहीच्या हिताचे कसे असू शकते, असा प्रश्न त्यांनी विचारला.

केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चौहान असेही म्हणाले, की जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हा इंडी अलायन्स घटनात्मक संस्थांचे राजकारण करण्यास सुरुवात करतात. जर न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला नाही, तर ते न्यायव्यवस्थेलाच आव्हान देतात. ते परदेशात जातात आणि परकीय शक्तींना भारताच्या लोकशाहीत हस्तक्षेप करण्याचे आवाहन करतात, असा आरोपही त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!