विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक पाच मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर…

vote
Share

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या तीन पदवीधर मतदारसंघांसह अमरावती आणि पुणे या दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुकांची घोषणा केली असून २३ ऑक्टोबर रोजी मतदान तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

पुढील मतदारसंघांमध्ये निवडणूक…
१. पुणे पदवीधर मतदारसंघ
२. नागपूर पदवीधर मतदारसंघ
३. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ
४. अमरावती शिक्षक मतदारसंघ
५. पुणे शिक्षक मतदारसंघ

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक
मतदानाची तारीख: २३ ऑक्टोबर
मतमोजणी व निकाल: २७ ऑक्टोबर

दरम्यान, पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नांवर गेल्या काही महिन्यात राष्ट्रवादी-भाजप कंबर कसून काम करीत आहे. पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या पदवीधर मतदारसंघांमध्ये मतदारांची नोंदणी आणि प्रचार मोहीम आधीपासूनच राष्ट्रवादी-भाजपकडून सुरू होती. विशेषत: भारतीय जनता पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. शिक्षकांचे वेतन, जुनी पेन्शन योजना, कायम विनाअनुदानित शाळांचे प्रश्न आणि पदवीधरांच्या रोजगाराचे मुद्दे या निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. २३ ऑक्टोबरला होणाऱ्या मतदानानंतर २७ ऑक्टोबरला जाहीर होणाऱ्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!