ठाकरेंच्या निष्ठावंत शिलेदाराचे जंगी स्वागत, 100 कोटींची ऑफर येऊनही…

mp-rajabhau-waje-nashik
Share

नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे हे दिल्लीतील नाट्यमय घडामोडींनंतर नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दिल्लीत ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) अंतर्गत ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंड केले असताना, कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स आणि कर्जमुक्तीची प्रलोभने धुडकावून राजाभाऊ वाजे उद्धव ठाकरेशी एकनिष्ठ राहिले. राजाभाऊ वाजे हे आज सकाळी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांनी त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीत अत्यंत जंगी व ऐतिहासिक स्वागत केले.

दिल्लीत ‘ऑपरेशन टायगर’ सुरू होते. मंगळवारी (16 जून) रात्रीपासून ठाकरे गटाचे फुटीर खासदार एक-एक करून दिल्लीत दाखल झाले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीत होते. उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेल्या 6 बंडखोर खासदारांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आले होते. अखेर या 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेऊन स्वतंत्र गट स्थापन करण्याचे पत्र दिले आणि हा गट लवकरच शिंदे गटात विलीन होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

या संपूर्ण फोडाफोडीच्या राजकारणात नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनाही गळाला लावण्यासाठी अतोनात प्रयत्न झाले. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊ यांनी आरोप केला आहे की, प्रत्येक खासदाराला 15 कोटींचे टोकन आणि 100 कोटींच्या विकासकामांची ऑफर दिली गेली होती. 14 एप्रिल रोजी शिंदे गटाचे देहू आणि ठाणे येथील दोन पदाधिकारी राजाभाऊ वाजे यांच्या सिन्नर येथील निवासस्थानी गेले होते. त्यांनी राजाभाऊंचे वडील प्रकाश वाजे यांची 2 ते अडीच तास मनधरणी केली, परंतु वाजे कुटुंबाने पक्षांतरास स्पष्ट नकार देत निष्ठा राखली.

नाशिकरोड रेल्वे स्थानकावर माध्यमांशी संवाद साधताना खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले, “ज्या विचारधारेतून मी निवडून आलो त्या विचारधारेशी मी प्रामाणिक आहे. ही समाधानाची भावना आहे. मी जो निर्णय घेतला तो योग्य आहे ही त्याची पावती आहे. मी प्रामाणिकपणे माझं काम करत आहे. कार्यकर्त्यांचा प्रेम होतच परंतु ते वाढले आहे. मला ऑफर मिळाली नव्हती, मला पाहिजे ते मला मिळत आहे आणि ते माझ्यासाठी खूप आहे.’

दरम्यान, दिल्लीत संजय राऊत यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत जेव्हा शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांचे नाते पोटतिडकीने सांगत होते आणि राजाभाऊंच्या निष्ठेचे तोंडभरून कौतुक करत होते, तेव्हा राजाभाऊ वाजे यांना आपल्या भावना अनावर झाल्या. पक्षावर आणि नेत्यावर ओढवलेल्या या परिस्थितीमुळे राजाभाऊ भावूक झाले आणि कॅमेऱ्यासमोरच त्यांनी दोनदा डोळ्यांतील अश्रू पुसल्याचे पाहायला मिळाले होते.

…आता आमचे ऑपरेशन तुडवा सुरू होणार : संजय राऊत

रामदास कदम यांचा ठाकरे यांना टोला; पक्षात तिघेच राहणार, देखो आगे क्या होता है…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *