धारदार आवाज आणि स्पष्टवक्तपणा असलेल्या अजित पवार यांची राजकीय कारकीर्द…

ajit-pawar-plane-crash
Share

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (वय ६६) यांच्या विमानाला आज (बुधवार) बारामतीमध्ये भीषण अपघात झाला आहे. या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. बारामतीमध्ये विमान लॅंड होताना झालेल्या अपघातानंतर विमानाला आग लागली आणि विमान जळून खाक झाले आहे. मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषदेच्या सभांसाठी जात असताना हा अपघात झाला. या घटनेमुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्रावर शोककळा! अजित पवार यांचे विमान अपघातात निधन…

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजितदादा प्रचारासाठी बारामतीला जात होते. या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आल्या होत्या. महानगर पालिका निवडणुकीचा निकाल पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांनी प्रचाराला वेग घेतला होता. हा अपघात नेमका कशामुळे झाला. तांत्रिक बाब काय, या सर्व प्रकरणाची चौकशी विमानतळ प्रशासनाने सुरू केली आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

अजित पवार म्हटले की धारदार आवाज आणि स्पष्टवक्तपणा असलेलं रांगडं व्यक्तिमत्व. समोरच्याचं काम होत असेल तर करणारच आणि होत नसेल तर त्याला नाही म्हणून तोंडावर सांगणारा नेता म्हणजे अजित पवार. विमान अपघातात त्यांचे आज दुर्दैवी निधन झाल्यामुळे कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या आहेत.

अजित पवार यांची राजकीय कारकीर्द…
नाव : अजित अनंतराव पवार
जन्मतारीख: 22 जुलै 1959
जन्मस्थान: देवळाली प्रवरा, राहुरी तालुका, अहमदनगर जिल्हा
शिक्षण: बी.कॉम
ज्ञात भाषा: मराठी, हिंदी, इंग्रजी
व्यवसाय: शेती
पत्नीचे नाव: सुनेत्रा अजित पवार
मुले: पार्थ आणि जय
बारामती विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त.
सदस्य वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्था, पुणे
रयत शिक्षण संस्था, सातारा संचालक
महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष – ऑगस्ट 2006 ते 19 ऑगस्ट 2018.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष – सप्टेंबर 2006 पासून
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन – मार्च 2013 पासून
सेवादास संचालक : महानंद आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन – सप्टेंबर 2005 ते मार्च 2013 आणि 25 नोव्हेंबर 2018 पासून अध्यक्ष म्हणून काम करत आहे
पूर्वीच्या विधानसभा / विधानपरिषद / लोकसभा / राज्यसभेचे सदस्य आणि संसद सदस्य / समिती प्रमुख म्हणून केलेले काम (कार्यकाळात)
लोकसभा सदस्य : जून 1991 ते सप्टेंबर 1991
विधानसभा सदस्य : 1991 ते 1995, 1995 ते 1999, 1999 ते 2004, 2004 ते 2009, 2009 ते सप्टेंबर 2014, 2014 ते 26 सप्टेंबर 2019. 2019 ते 2024
राज्य/केंद्रीय मंत्री/राज्यमंत्री म्हणून केलेले काम (कार्यकाळ)
कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री: जून 1991 ते नोव्हेंबर 1992
पाणीपुरवठा, ऊर्जा आणि नियोजन राज्यमंत्री: नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993
पाटबंधारे मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे), फलोत्पादन : ऑक्टोबर 1999 ते जुलै 2004
ग्रामीण विकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पाटबंधारे मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळ): जुलै 2004 ते नोव्हेंबर 2004
जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे पाटबंधारे वगळून), जलसंपदा आणि स्वच्छता : नोव्हेंबर 2004 ते नोव्हेंबर 2009.
जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे वगळून), ऊर्जा : नोव्हेंबर 2009 ते नोव्हेंबर 2010
उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन आणि ऊर्जा): नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012
उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन आणि ऊर्जा): डिसेंबर 2012 ते सप्टेंबर 2014
उपमुख्यमंत्री : 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2019
उपमुख्यमंत्री : 30 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022
विरोधी पक्षनेते : 4 जुलै 2022 ते 30 जून 2023
उपमुख्यमंत्री : 2 जुलै 2023 ते 26 नोव्हेंबर 2024
महायुती सरकारच्या काळात देखील ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून कार्यरत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *