चक्क दहा रुपयांच्या नाण्यांचा वापर करून तेलंगणातील व्यक्तीने घेतली १.२३ लाख रुपयांची होंडा अॅक्टिव्हा

Share

मंचेरियाल: तेलंगणाच्या मंचेरियाल जिल्ह्यातील लक्सेटिपेट येथील बी. रवी जोसेफ (वय ५१) यांनी सलग तीन वर्षांपासून जमा केलेल्या १० रुपयांच्या नाण्यांचा वापर करून, १ लाख २३ हजार रुपये किमतीची नवीन होंडा ॲक्टिव्हा खरेदी केली आहे. हे एक शिस्तबद्ध बचत आणि स्वप्नपूर्तीचे असामान्य उदाहरण ठरले आहे.

चर्चचे पालक असलेल्या जोसेफ यांनी १० ऑक्टोबर २०२३ पासून नाणी साठवायला सुरुवात केली. ते रोजच्या खरेदीत सुट्टे पैसे म्हणून मिळणारे प्रत्येक १० रुपयांचे नाणे बाजूला ठेवत असत. गेल्या तीन वर्षांपासून, आपल्या दैनंदिन खर्चातून आणि किराणा दुकानातून केलेल्या खरेदीतून थोडे थोडे करून काही पैसे वाचवण्यात यशस्वी झालो आणि १ लाख २३ हजार रुपये वाचवले, असे त्यांनी सांगितले. मात्र, आर्थिक अडचणींमुळे रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट मोटरसायकल खरेदी करू न शकल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

जोसेफ यांनी १० ऑक्टोबर २०२३ पासून नाणी गोळा करण्यास सुरुवात केली होती. सुरवातीला, त्यांनी ही बचत घरातील उपयुक्त वस्तू खरेदी करण्यासाठी वापरण्याचा विचार केला, पण नंतर दुचाकी खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

त्यांचा बचतीचा प्रवास आव्हानांशिवाय नव्हता कारण १० रुपयांची नाणी बंद केली जातील किंवा त्यांचा कायदेशीर चलन दर्जा काढून घेतला जाईल, अशा अफवा त्यांनी ऐकल्या होत्या, त्यामुळे कुटुंबातील काही सदस्यांनी त्यांना यापुढे बचत करण्यापासून परावृत्त केले होते. तथापि, आपण हार मानली नाही. एकेक व्यवहार करून नाणी वाचवत राहिलो, असे त्यांनी सांगितले.

अखेरीस जमा झालेली नाणी एका शोरूममध्ये नेली, तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी एकूण रक्कम १ लाख २३ हजार रुपये असल्याची पुष्टी करण्यापूर्वी, जवळपास दोन तास ती मोजली. लक्सेटिपेट येथील जगदंबा होंडा मोटर्समधून त्यांनी हे वाहन खरेदी केले आहे. जोसेफ जेव्हा वाहन स्वीकारायला गेले, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय होते.

खरेदीसाठी केलेल्या या आगळ्यावेगळ्या पेमेंट पद्धतीमुळे शोरूममध्ये तसेच स्थानिकांचेही लक्ष वेधले गेले आहे. त्यांच्या तीन वर्षांच्या प्रयत्नांनी रोजच्या वापरातील चिल्लर नाण्यांतून एक मोठी वैयक्तिक खरेदी करून त्यांनी आपली इच्छा पूर्ण केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!